ज्येष्ठ अभिनेते आलोक नाथ यांनी त्यांच्यावर केलेला बलात्काराचा आरोप फेटाळला आहे. प्रसिद्ध दिग्दर्शिका-निर्मात्या विनता नंदा यांनी आपल्या फेसबुक पोस्टद्वारे त्यांच्यावर बलात्काराचा आरोप केला आहे. ‘मी हे आरोप नाकारत नाही आणि स्वीकारतही नाही. ती घटना (बलात्कार) घडली असावी, पण कोणा दुसऱ्या व्यक्तीने तो केला असावा. मी या विषयावर अधिक बोलणार नाही कारण तितकाच तो ताणला जाईल,’ असं आलोक नाथ एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

१९९० मधील गाजलेली मालिका ‘तारा’च्या निर्मात्या विनता नंदा यांनी आपल्या पोस्टमध्ये, २० वर्षांपूर्वी बॉलिवूड व टीव्हीच्या दुनियेतील ‘सर्वात संस्कारी अभिनेत्याने’ माझ्यावर बलात्कार केल्याचं म्हटलं आहे. आपल्या संपूर्ण पोस्टमध्ये विनता नंदा यांनी त्या अभिनेत्याचं नाव लिहिलेलं नाही. मात्र, आपल्या पोस्टच्या अखेरीस त्यांनी ‘संस्कारी अभिनेता’ असा उल्लेख केला आहे, त्यामुळे त्यांचा रोख अलोक नाथ यांच्याकडे असल्याचं स्पष्ट होत आहे.

विनता नंदा यांच्याशी मैत्री असल्याची कबुली देत आलोक नाथ पुढे म्हणाले, ‘एकेकाळी ती माझी खूप चांगली मैत्रीण होती. आज तिने माझ्यावर इतके गंभीर आरोप केले आहेत. आज ती जे काही आहे, ते माझ्यामुळेच आहे. तिने केलेल्या आरोपांवर मी काही प्रतिक्रिया देणं निरर्थक आहे, कारण सध्याच्या घडीला महिला जे बोलते तेच सत्य मानलं जातं. त्यामुळे अशा परिस्थितीत मी काहीही बोलणं चुकीचं ठरेल.’

या संपूर्ण प्रकरणाची ‘सिने अॅण्ड टीव्ही आर्टिस्ट असोसिएशन’ने (CINTAA) दखल घेतली असून आलोक नाथ यांच्याविरोधात कारणे दाखवा नोटीस बजावली जाणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Alok nath dismisses writer producer vinta nanda sexual assault allegations