बॉलिवूडमध्ये #MeToo मोहिम सुरू झाल्यापासून एका पाठोपाठ एक नामांकित व्यक्तींची नावं समोर येत आहेत. या यादीत बॉलिवूडच्या संस्कारी अभिनेता आलोक नाथ यांच्या नावाचाही समावेश आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक-निर्मात्या विनता नंदा यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून आलोक नाथ यांच्यावर बलात्काराचा आरोप केला आहे. विनता नंदा यांच्या आरोपानंतर आलोक नाथ यांनी कायद्याचा आधार घेत विनता नंदा यांच्याविरोधात न्यायालयात धाव घेतली आहे.
२० वर्षांपूर्वी बॉलिवूड व टीव्हीच्या दुनियेतील ‘सर्वात संस्कारी अभिनेत्याने’ माझ्यावर बलात्कार केल्याचा आरोप विनता नंदा यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून केला. विनता नंदा यांच्या पोस्टनंतर काही अभिनेत्री आणि महिलांनीही आलोक नाथ यांच्यावर गैरवर्तणुकीचे आरोप केले. या प्रकरणामुळे मानहानी झाल्याचं म्हणत आलोक नाथ यांनी विनता नंदाविरोधात न्यायालयामध्ये मानहानीचा दावा केला आहे.
#AlokNath has filed a defamation case against writer-producer Vinta Nanda, who had accused him of rape pic.twitter.com/kQUZ9ZTGPg
— ANI (@ANI) October 13, 2018
दरम्यान, आलोक नाथ यांनी तक्रार दाखल करत त्यांच्यावर झालेल्या आरोपांची चौकशी करण्याचीही मागणीही केल्याचं सांगण्यात येत आहे. विनता नंदा यांच्या आरोपानंतर ‘हम साथ साथ है’ चित्रपटाची क्रू मेंबर, अभिनेत्री संध्या मृदुल, नवनीत निशान यांनीसुद्धा आलोक नाथ यांच्यावर लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप केले आहेत.