अभिनेत्री सुष्मिता सेन ही सध्या बॉलिवूड करिअरपेक्षा खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. आयपीएलचे माजी चेअरमन ललित मोदी यांनी सोशल मीडियावर सुष्मिता सेनसोबतच्या नात्याची कबुली दिल्यानंतर या दोघांच्या नात्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होताना दिसत आहे. इतकंच नव्हे तर ते दोघे लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याचे बोललं जात आहे.ललित मोदींसोबत नाव जोडल्यानंतर नेटकऱ्यांनी तिला ‘गोल्ड डिगर’ (संधी साधू) असं म्हटलं आहे. तर काहींनी सुष्मिता ही केवळ पैशांसाठी डेट करत असल्याचं म्हटलं आहे. नुकतंच तिने यावर संताप व्यक्त केला आहे.

सुष्मिता सेन ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय असते. नुकतंच तिने इन्स्टाग्रामवर एक लांबलचक पोस्ट शेअर केली आहे. यात तिचा एक पाठमोरा फोटोदेखील शेअर केला आहे. याला कॅप्शन देताना तिने ट्रोलर्सला सडेतोड उत्तर दिले आहे. यात ती म्हणाली, “गेल्या काही दिवसांपासून माझ्या नावापुढे गोल्ड डिगर म्हणजेच संपत्तीसाठी लोकांशी संबंध ठेवणारी म्हणून संबोधले जात आहे. यावरुन सोशल मीडियावर मला ट्रोलही केले जात आहे. यावरुन माझ्यावर जोरदार टीकाही केली जात आहे. पण मी टीकाकारांची अजिबात पर्वा करत नाही.”

Manmohan Singh launched the Technology Mission on Citrus for orange growers in Vidarbha
डॉ.मनमोहन सिंग, नागपूरची संत्री आणि ‘मिशन सिट्रस’
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Changes in gold prices What are today gold rates
सोन्याच्या दरात मोठे बदल… हे आहेत आजचे दर…
minister dhananjay munde meet cm devendra fadnavis over murder of sarpanch santosh deshmukh
आरोपांनंतर धनंजय मुंडे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला; देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी
loksatta editorial on rupee getting weaker day by day against the dollar
अग्रलेख : बबड्या रुपया, कारटा डॉलर
satish wagh murder case mohini wagh and 5 others remanded to police custody till 30 december
खून करण्यामागे कारण आर्थिक की अनैतिक संबंध? सतीश वाघ खून प्रकरणात पत्नीला पोलीस कोठडी
rupee continues to depreciate, US dollar, rupee ,
रुपयाचे मूल्य आणखी खोलात!
Income Tax , salary , Finance Minister,
पगारदारांच्या ‘इन्कम टॅक्स’मध्ये कपात? क्रयशक्तीत वाढीसाठी अर्थमंत्र्यांकडून उपाय शक्य

“मी ललित मोदीला जावई म्हणून…”, सुष्मिता सेनच्या रिलेशनशिपवर वडिलांची पहिली प्रतिक्रिया

“आपल्या आजूबाजूला असणारी माणसे किती नकारात्मक, असंतुष्ट झाली आहेत, हे यातून स्पष्ट दिसत आहे. हे सर्व हृदयद्रावक आहे. अनेकजण याबद्दल त्यांचे मत व्यक्त करत आहेत. याबद्दल ठिकठिकाणी गॉसिप सुरु आहे. विशेष म्हणजे मी ज्यांना कधीही भेटली नाही, ते देखील माझ्याबद्दल चर्चा करत आहेत. अनेकजण माझ्याबद्दल सर्व काही माहिती असल्यासारखे सांगताना दिसत आहेत. ते माझ्या चारित्र्याबद्दल गप्पा मारत आहेत. मला गोल्ड डिगर म्हणतात. पण मला याची पर्वा नाही.”

“कारण मी सोन्यापेक्षा नेहमी हिऱ्यांना प्राधान्य देते आणि अजूनही ते स्वत: विकत घेते. त्यामुळे मला गोल्ड डिगर म्हणणारे खालच्या मानसिकतेचे आहेत, हे स्पष्टपणे दिसून येते. या क्षुल्लक लोकांव्यतिरिक्त मला माझ्या हितचिंतकांचा आणि कुटुंबीयांचा पूर्ण पाठिंबा आहे. कारण मी सूर्यासारखी आहे, जो नेहमी त्याच्या अस्तित्वासाठी चमकतो”, असे सुष्मिता सेनने म्हटले आहे.

सुष्मिता सेन आणि ललित मोदींच्या रिलेशनशिपवर एक्स बॉयफ्रेंडची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला…

दरम्यान ललित मोदी आणि सुष्मिता सेन बऱ्याच वर्षांपासून एकमेकांना ओळखतात. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांची घट्ट मैत्री आहे. ते अनेकदा सोशल मीडियावर विविध फोटो व्हिडीओ शेअर करताना दिसतात. विशेष म्हणजे अनेकदा ते दोघे एकमेकांसाठीही पोस्ट शेअर करतात. ललित मोदी यांनी काही दिवसांपूर्वी सुष्मितासोबतचे काही फोटो शेअर करत एक ट्वीट केलं होतं. यात त्यांनी “कुटुंबासोबत मालदीव, सार्दानियाच्या दौऱ्यावरुन नुकताच लंडनला परतलो. यावेळी माझी ‘बेटर हाफ’ सुश्मिता सेनही सोबत होती. अखेर नवी सुरुवात आणि नवं आयुष्य सुरू झालं आहे. माझ्या आनंदाला पारावार उरलेला नाही,” असे म्हटले होते.

Story img Loader