मराठी चित्रपटसृष्टीत सध्या गाजत असलेले दिग्दर्शक म्हणजे रवी जाधव, सतीश राजवाडे, संजय जाधव. या दिग्दर्शकांनी त्यांच्या चित्रपटांनी मराठी चित्रपटसृष्टीला एक वेगळे वळण दिले आहे. ब्लॉकबस्टर चित्रपट देणा-या दिग्दर्शकांमध्ये त्यांची गणना केली जाते. त्यात संजय जाधवने चित्रपटसृष्टीला ‘चेकमेट’ , ‘रिंगा रिंगा’,’ दुनियादारी’ आणि ‘प्यार वाली लव्हस्टोरी’ यांसारखे दमदार चित्रपट दिले आहेत. पण अनेक प्रेक्षकांच्या मनात सध्या घोंगावत असलेला प्रश्न म्हणजे संजयच्या चित्रपटात दिसणारी सई-स्वप्नीलची जोडी.
‘दुनियादारी’, ‘प्यार वाली लव्हस्टोरी’ आणि अगदी काल प्रदर्शित झालेल्या ‘तू ही रे’ चित्रपटात सई ताम्हणकर आणि स्वप्नील जोशी यांची जोडी झळकली. त्यामुळे अनेकांच्या मनात हा प्रश्न आला की, संजयच्या चित्रपटात हे दोघे असण्यामागचे कारण काय? तर त्याबद्दल संजय म्हणाला की, ‘सई-स्वप्नील हे इतर कोणाच्या चित्रपटात एकत्र दिसत नाहीत म्हणून ते माझ्या चित्रपटात एकत्र दिसतात. त्यांची जोडी छान दिसते. स्वप्नील माझ्या लहान भावासारखा आहे आणि त्यांना चित्रपटात घेऊन मी काही गुन्हा करत नाहीए.’
संजय जाधव दिग्दर्शित ‘तू ही रे’ हा चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित झाला आहे. त्याचा हा चित्रपट तिकीटबारीवर काय कमाल करतो ते पाहणे नक्कीचं औत्सुक्याचे राहील.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा