Amala Paul Jagat Desai wedding photos : दाक्षिणात्य अभिनेत्री अमाला पॉलने रविवारी (५ नोव्हेंबर २०२३ रोजी) दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधली. तिने केरळमधील कोची येथे तिचा बॉयफ्रेंड जगत देसाई याच्याशी लग्न केलं. त्यांचं लग्न ग्रँड हयात कोची बोलगट्टी इथे पार पडलं. अमाला व जगत यांनी इन्स्टाग्रामवर त्यांच्या लग्नाची घोषणा केली. त्यांच्या लग्नाचे फोटो सध्या चर्चेत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘शार्क टँक इंडिया 3’ मध्ये दिसतील १२ शार्क, अश्नीर ग्रोव्हरने उडवली खिल्ली; म्हणाला, “या शोचा दर्जा…”

अमाला व जगतने अगती मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत लग्न केलं. लग्नाच्या फोटोंमध्ये अमाला आणि जगत लॅव्हेंडर रंगाच्या पोशाखात ट्विनिंग करताना दिसले. दोघेही लग्नात खूप सुंदर दिसत होते. “दोन जीव, एक नशीब… माझ्या दैवी स्त्रीत्वाबरोबर हातात हात घालून आयुष्यभर चालत राहीन,” असं कॅप्शन फोटोबरोबर जगतने दिलंय.

काही दिवसांपूर्वी जगत देसाईने अमाला हिला गोव्यातील एका रिसॉर्टमध्ये तिच्या वाढदिवसानिमित्त प्रपोज केले होते. जगत गोव्याचा असून तो राज्यातील एका प्रसिद्ध लक्झरी व्हिलामध्ये मॅनेजर म्हणून काम करतो. काही आठवड्यांपूर्वीच या जोडप्याने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करून त्यांचं नातं सार्वजनिक केलं होतं.

अमालाचे पहिले लग्न तमिळ दिग्दर्शक एएल विजयशी झाले होते, पण तीन वर्षांच्या संसारानंतर दोघांनी घटस्फोट घेतला. २०१४ मध्ये या जोडप्याने लग्न केलं आणि काही गैरसमजांमुळे २०१७ मध्ये त्यांच्या घटस्फोट झाला. धनुषमुळे या दोघांचा घटस्फोट झाल्याचा आरोप तिच्या सासऱ्यांनी केला होता, पण अमालाने हे सर्व आरोप फेटाळून लावले होते.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amala paul married to boyfriend jagat desai see wedding photos hrc