बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग सध्या त्याच्या न्यूड फोटोशूटमुळे चांगलाच चर्चेत आला आहे. रणवीर विरोधात एफआयआरही दाखल करण्यात आलीय. अनेकांनी रणवीरच्या न्यूड फोटोशूटवर टीका केली असली तरी अनेकांनी त्याला सपोर्ट केलाय. अद्याप रणवीरने त्याच्या न्यूड फोटोशूटमुळे सुरू असलेल्या वाद विवादावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
बॉलिवूडपासून अगदी दाक्षिणात्य सेलिब्रिटींनीदेखील रणवीरच्या न्यूड फोटोशूटनंतर सुरु असलेल्या वादावरून टीकाकारांना सुनावलं आहे. अशाता आता अमेरिकन मॉडेल आणि युट्युबर असलेल्या अमांडा सेर्नीने तर शॉपिंग मॉलमध्ये कपडे काढून रणवीरला पाठिंबा दिलाय. अमांडाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या चांगलाच व्हायरल होतोय. या व्हिडीओ थक्क करणारा आहे.
हे देखील वाचा:“मी ब्रा कशाला लपवू…” आलिया भट्टचं बोल्ड वक्तव्य चर्चेत
अमांडाने “जस्टिस फॉर रणवीर म्हणजेच रणवीरसाठी न्याय?” असं कॅप्शन देत एक व्हिडीओ शेअऱ केलाय.या व्हिडीओ सुरुवातीला अमांडा फोनवर बोलताना दिसतेय आणि अचानक ती फोन ठेवून तिचे कपडे काढू लागते. अमांडा तिचे सर्व कपडे काढते. या व्हिडीओत ती शॉपिंग मॉलमध्ये नग्न अवस्थेतच वेगवेगळ्या पोज देताना दिसतेय. या व्हिडीओच्या बॅकग्राउंडला एक आवाज आहे.
कोण आहे अमांडा सर्नी?
यापूर्वीही अमांडा अनेकदा चर्चेत आली आहे. यापूर्वी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिल्यामुळे अमांडा चर्चेत आली होती. अमांडा सोशोल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. इन्स्टाग्रामवर ती कायम बोल्ड फोटो शेअर करत असते. आमांडाने प्ले बॉय या इंग्रजी मासिकासाठी मॉडेलिंग केलंय. इन्स्टाग्रामवर अमांडाचे २३.८ मिलियन फॉलोअर्स आहेत. अमांडाने भारतातही एक कॉन्सर्ट केलं होतं.