सुनील बर्वे यांच्या ‘सुबक’ संस्थेची निर्मिती असलेले आणि ‘कलाकारखाना’ प्रस्तुत ‘अमर फोटो स्टुडिओ’ हे नाटक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले होते. अभिनेते सुनील बर्वे हे सोशल मीडियावर सतत सक्रीय असतात. अवघ्या दोन दिवसांपूर्वी त्यांच्या ‘अमर फोटो स्टुडिओ’ या नाटकाचा शेवटचा प्रयोग पार पडला. यानिमित्ताने त्यांनी एक पोस्ट शेअर केली आहे.

‘अमर फोटो स्टुडिओ’ या नाटकात अमेय वाघ, सुव्रत जोशी, पूजा ठोंबरे, सिद्धेश पुरकर, सखी गोखले, लेखिका मनस्विनी, निर्माते सुनील बर्वे हे कलाकार झळकले होते. नुकतंच याबद्दल एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात त्यांनी अभिनेत्री पर्ण पेठेचेही कौतुक केले आहे.
आणखी वाचा : “… म्हणून ‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपटात काम करण्याची संधी हुकली”, किरण मानेंनी व्यक्त केली खंत, म्हणाले “बिग बॉस…”

paaru fame sharayu sonawane get ukhana for husband Jayant lade
“संसार असतो दोघांचा…”, ‘पारू’ फेम अभिनेत्री शरयू सोनावणेने घेतला हटके उखाणा, म्हणाली…
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
chhaava movie lezim scene controversy marathi actress ruchira jadhav
“चित्रपट बघण्याआधीच निर्बुद्धपणे…”, ‘छावा’च्या वादावर मराठी अभिनेत्रीचं स्पष्ट मत; म्हणाली, “माझ्या राजाला…”
Tejshree Pradhan
“जे हक्काचे…”, तेजश्री प्रधान ‘प्रेमाची गोष्ट’ मालिका सोडल्यावर काय करतेय? म्हणाली, “आताच्या घडीला…”
Marathi actress Tejashri Pradhan says May I get an Oscar sometime in my life
“मला कधी तरी आयुष्यात ऑस्कर मिळो…” म्हणत तेजश्री प्रधानने सांगितली तिची हळवी जागा, म्हणाली…
udayanraje Bhosle called chhava director laxman utekar
‘छावा’तील ‘ती’ दृश्ये बदलणार? उदयनराजेंनी थेट फोन केल्यावर दिग्दर्शक म्हणाले, “चित्रपटामध्ये फक्त आपले राजे…”
elizabeth ekadashi fame sayali bhandakavathekar talk about why didn't choose acting field
‘एलिझाबेथ एकादशी’ फेम झेंडूने पुढे अभिनय क्षेत्र का निवडलं नाही? सायली भांडाकवठेकर म्हणाली, “हे भयानक…”
maharashtrachi hasya jatra new actress Ashwini kasar entry
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये झळकली ‘ही’ लोकप्रिय अभिनेत्री! सेटवरचा फोटो शेअर करत म्हणाली, “मला सांभाळून घेतल्याबद्दल…”

सुनील बर्वेंची पोस्ट

“काल ‘अमर फोटो स्टुडिओ’ ह्या आमच्या नाटकाचा बोरिवलीतील शेवटचा प्रयोग होता, तसाच तो पर्ण पेठेचा ही शेवटचा प्रयोग होता. सखी शिकायला परदेशी गेल्यानंतर पर्ण प्रयोग करायला लागली, सखी परत आल्यावर दोघी आलटून पालटून प्रयोग करत राहिल्या. नंतर आठ नऊ महिने प्रयोगच झाले नाहीत, दरम्यान पर्णने चारचौघी नाटक घेतलं, आणि ते धुंवाधार चालू लागलं. अमर… चे शेवटचे काही प्रयोग करायचे ठरवल्यावर तिला प्रयोग करणं शक्य होत नव्हतं म्हणून आम्हाला सगळ्यांनाच वाईट वाटंत होतं, पण as luck would have it कालचा प्रयोग करणं तिला शक्य झालं आणि तो तिचा अमर फोटो स्टुडिओ चा शेवटचा प्रयोग ठरला.

सखी ऐवजी ती प्रयोग करण्याचं ठरलं तेव्हासुद्धा आम्ही तीचं स्वागत आगळ्या वेगळ्या पद्धतिने केलं, म्हणूनच तिच्या शेवटच्या प्रयोगाला सुद्धा आगळे वेगळेपणा टिकवून ठेवला!

पर्ण, काल तू आम्हा सगळ्यांचे आभार मानलेस, तेव्हा भरून आलं होतं. पण मी सुबक आणि कलाकारखाना च्या टीमच्या वतीने तुझे मनापासून आभार मानतो!!! सखी परदेशी जाण्याचा विचार करत होती तेव्हा अमर.. ऐन बहरात होतं. ते पुढे कसं न्यायचं हा आमच्या समोरचा प्रश्न तू सोडवलास, आणि प्रयोगांची घोडदौड देशात-परदेशातही तशीच चालू ठेवलीस. तू एक उत्तम कलाकार आहेसंच, पण एक सहृदयी माणूस सुद्धा आहेस हे जाणवलं!

तुझ्या पुढील वाटचालीसाठी माझ्या व अपर्णा कडून आणि अमर.. च्या संपूर्ण टीम कडून अनेक अनेक शुभेच्छा!!!”, असे सुनील बर्वे यांनी म्हटले आहे.

आणखी वाचा : “माझं सर्व खरं-खोटं देवालाच ठाऊक”, मानसी नाईकच्या पोस्टने वेधलं लक्ष, म्हणाली “मी आयुष्यात…”

दरम्यान त्यांनी शेअर केलेल्या व्हिडीओत सुनील बर्वे हे पर्ण पेठेचे कौतुक करताना दिसत आहे. तसेच पर्ण पेठेनेही नाटकात काम करणाऱ्या कलाकारांचे कौतुक केले आहे.

Story img Loader