हृतिक रोशन आणि कतरिना कैफ यांचा अभिनय असलेल्या ‘बँग बँग’ चित्रपटात काही थरारक आणि दुर्मिळ हाणामारीची दृष्ये पाहायला मिळणार आहेत. ‘अमेझिंग स्पायडर मॅन २’चा स्टंट डायरेक्टर या चित्रपटातील हाणामारीच्या दृष्यांचे दिग्दर्शन करणार आहे. ह्या दृष्यांचे चित्रीकरण अबू-धाबीमध्ये होणार असून, ‘अमेझिंग स्पायडर मॅन २’चा स्टंट डायरेक्टर अॅण्डी आर्मस्ट्राँग ही दृष्ये साकारणार आहे. या विषयीच्या टि्वटरवरील संदेशात चित्रपट समीक्षकानी म्हटले आहे की, या अगोदर बॉलिवूडपटात कधीही पाहायला न मिळालेली हाणामारीची दृष्ये हृतिक रोशन आणि कतरिना कैफ ‘बँग बँग’ चित्रपटात साकारणार असून, ह्या दृष्यांचे चित्रीकरण अबू-धाबीत होणार आहे. ‘अमेझिंग स्पायडर मॅन २’ चित्रपटाचा स्टंट डायरेक्टर अॅण्डी आर्मस्ट्राँगने यात काही अदभूत कार स्टंट साकारले आहेत. सिद्धार्थ आनंदच्या ‘बँग बँग’ चित्रपटासाठी फेब्रुवारी महिन्यात चित्रीकरण केल्यानंतर काही काळासाठी विश्रांती घेतलेला हृतिक रोशन पुन्हा एकदा चित्रपटात अॅक्शन दृष्ये साकारण्यासाठी सज्ज झाला आहे. मागील वर्षी याच चित्रपटातील हाणामारीची दृष्ये साकारताना हृतिकच्या डोक्याला इजा झाल्याने चित्रपटाचे शूटिंग काही महिन्यांसाठी खोळंबले होते. दिग्दर्शक सिद्धार्थ राज आनंदचा ‘बँग बँग’ हा चित्रपट अॅक्शन-थ्रिलर-रोमॅन्टिक प्रकारातील चित्रपट आहे. ‘फॉक्स स्टार स्टुडिओ’ निर्मित हा चित्रपट टॉम क्रुझ आणि कॅमेरॉन डिआझ यांचा अभिनय असलेल्या ‘नाईट अॅण्ड डे’ या हॉलिवूडपटावर आधारित आहे. या वर्षी ऑक्टोबर महिन्याच्या २ तारखेला हा चित्रपट चित्रपटगृहात झळकेल.

Story img Loader