Anant Ambani-Radhika Merchant Wedding: अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांच्या लग्नाआधीच्या कार्यक्रमांना जोरदार सुरुवात झाली आहे. १२ जुलैला दोघं लग्नबंधनात अडकणार आहे. पण त्याआधी अंबानींनी अनेक कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे. काल, २ जुलैला ५० गरीब जोडप्यांचा सामूहिक विवाह सोहळा पार पडला. या सामूहिक विवाह सोहळ्याला स्वतः मुकेश अंबानी, नीता अंबानी, आकाश अंबानी, श्लोका अंबानी, ईशा अंबानी, आनंद पिरामल यांनी उपस्थिती लावली होती. यावेळी अंबानी कुटुंबातील सदस्यांनी नवविवाहित जोडप्यांना खास भेटवस्तू, १ लाखांचा चेक आणि जीवनावश्यक गोष्टी दिल्या. तसंच प्रत्येक जोडप्याला भेटून आशीर्वादही देताना अंबानी कुटुंब पाहायला मिळालं. याचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. काल झालेल्या सामूहिक विवाह सोहळ्यानंतर आज मामेरू कार्यक्रम पार पडत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मामेरू ही एक गुजराती प्रथा आहे. या प्रथेनुसार अंबानी कुटुंबाचा आज मामेरू कार्यक्रम होतं आहे. या कार्यक्रमासाठी अंबानी कुटुंबाचं मुंबईतील अँटिलिया घर खास सजवण्यात आलं आहे. फुलांनी व आकर्षक विद्युत रोषणाईने अँटिलिया सजवलेलं पाहायला मिळत आहे. अंबानींची होणारी लाडकी सून राधिका मर्चंट मामेरू कार्यक्रमासाठी पोहोचली आहे. याचा व्हिडीओ समोर आला आहे.

हेही वाचा – नितीश चव्हाणच्या ‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेत झळकणार ‘झी मराठी’चा जुना लोकप्रिय चेहरा, जाणून घ्या…

सेलिब्रिटी फोटोग्राफर ‘विरल भयानी’च्या इन्स्टाग्राम पेजवर राधिका मर्चंटचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये, मामेरू कार्यक्रमातील राधिका मर्चंटची एन्ट्री पाहायला मिळत आहे. यावेळी ती गुलाबी रंगाच्या भरजरी अशा लेहेंग्यात दिसत असून राधिकाने त्यावर सुंदर अशी केसाची वेणी घातली आहे. मामेरू कार्यक्रमातील राधिकाच्या या लूकने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

हेही वाचा – “आयुष्यातला सर्वात मोठा घोटाळा..”, पूजा भट्टबरोबर झालेल्या ब्रेकअपविषयी पहिल्यांदाच रणवीर शौरीने सोडलं मौन!, म्हणाला…

दरम्यान, अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांचं १२ जुलैला हिंदू पद्धतीनं लग्न होणार आहे. त्यानंतर १३ जुलैला शुभ आशीर्वादाचा कार्यक्रम होणार असून १४ जुलैला मोठा रिसेप्शन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या लग्नसोहळ्यात बॉलीवूड सेलिब्रिटींसह दिग्गज मंडळी उपस्थित राहणार आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ambani daughter in law radhika merchant traditional look for mameru ceremony video viral pps