Anant Ambani-Radhika Merchant Sangeet: एन्कोर हेल्थकेअर प्रायव्हेट लिमिटेडचे ​​सीईओ वीरेन मर्चंट व उद्योजिक शैला मर्चंट यांची लेक राधिका मर्चंट लवकरच अंबानींची सून होणार आहे. मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानीशी राधिका १२ जुलैला लग्नबंधनात अडकणार आहे. मोठ्या थाटामाटात अनंत-राधिका लग्नसोहळा मुंबईत पार पडणार आहे. सध्या लग्नाआधीचे कार्यक्रम जोरदार सुरू आहेत. ५ जुलैला संगीत सोहळ्याचे आयोजन करण्यात आलं होतं. या संगीत सोहळ्यात जगप्रसिद्ध पॉपस्टार जस्टिन बीबरसह बॉलीवूड कलाकारांनी जबरदस्त डान्स केला. एवढंच नव्हे अंबानी कुटुंबातील सदस्य देखील थिरकले. सध्या अनंत-राधिकाच्या संगीत सोहळ्यातील व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत. अशातच राधिका मर्चंटचा डान्स व्हिडीओ समोर आला आहे.

अनंत अंबानी-राधिका मर्चंटच्या लग्नाला अवघे काही दिवस बाकी आहेत. पण लग्नाआधी आणि लग्नानंतर अनेक कार्यक्रमाचं आयोजन अंबानींनी केलं आहे. त्यानुसार लग्नाआधी सामूहिक विवाह सोहळा, मामेरू समारंभ, गरबा नाईट आणि संगीत सोहळा पार पडला आहे. ५ जुलैला झालेल्या संगीत सोहळ्यात अंबानींच्या होणाऱ्या लाडक्या सूनेने सुंदर डान्स केला.

Lagnanatr Hoyilch Prem
Video: ‘लग्नानंतर होईलच प्रेम’मधील काव्या व जीवाचा ‘लव्हयापा’वर डान्स; चाहते म्हणाले, “लय भारी”
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
kiliye kiliye new song
‘काय ती स्टाईल….काय तो स्वॅग…सगळंच एकदम भारी!’ चिमुकल्याचा डान्स पाहून नेटकऱ्यांना Jr. NTR आठवला…Viral Video बघाच
a young girl amazing dance on a stage Her face expression
Video : तरुणीने केला एक नंबर डान्स! चेहऱ्यावरील हावभाव आणि ऊर्जा पाहून नेटकऱ्यांनी केला कौतुकाचा वर्षाव
bride groom dance on Bollywood song Akelaa hai mister khilaadi miss khilaadi chaahiye
Video : अकेला है मिस्टर खिलाडी मिस खिलाडी चाहिए! नवरी नवरदेवाने केला बॉलीवूड गाण्यावर भन्नाट डान्स, व्हिडीओ होतोय व्हायरल
Aishwarya And Avinash Narkar dance video
नारकर जोडप्याचा तामिळ गाण्यावर जबरदस्त डान्स! Video पाहून मराठी अभिनेत्री म्हणते, “हा ग्रुप कसा जॉईन करायचा…”
Sakhi Gokhale and suvrat joshi dance on shahrukh khan lutt putt gaya song
Video: सखी गोखले-सुव्रत जोशीचा पहाटे २ वाजता शाहरुख खानच्या ‘या’ गाण्यावर भन्नाट डान्स, पाहा व्हिडीओ
Lakhat Ek Aamcha Dada
Video : महेश जाधवचा अभिनेत्रीबरोबर जबरदस्त डान्स; जुई तनपुरे व्हिडीओ शेअर करत म्हणाली, “आमचा मावळा…”

हेही वाचा – “धनाढ्य कुटुंबातील…”, अनंत अंबानी-राधिका मर्चंटच्या संगीत सोहळ्याची मराठी अभिनेत्याने उडवली खिल्ली, म्हणाला, “मला माझ्या छोट्या…”

संगीत सोहळ्यातील राधिकाचा डान्स व्हिडीओ ‘फिल्मी ग्यान’ या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओत राधिका राणी मुखर्जीच्या ‘साथिया’ चित्रपटातील ‘छलका छलका रे’ गाण्यावर सुंदर डान्स करताना पाहायला मिळत आहे. राधिकाचा हा डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

हेही वाचा – Video: ८३ कोटींचं मानधन घेणाऱ्या जस्टिन बीबरच्या गाण्यांवर थिरकले अंबानींचे पाहुणे, पाहा जगप्रसिद्ध पॉपस्टारचा परफॉर्मन्स

हेही वाचा – लहान भावाच्या संगीत सोहळ्यात ईशा अंबानीचा ग्लॅमरस लूक, निळ्या रंगाची ही साडी भारतात नव्हे तर विदेशात झालीये तयार

दरम्यान, अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट १२ जुलैला शुभ मुहूर्तावर म्हणजेच दुपारी ३ वाजता लग्नबंधनात अडकणार आहेत. माहितीनुसार, अंबानींच्या अँटिलिया निवासस्थानी दोघं लग्नाचे सात फेरे घेणार आहेत. त्यानंतर १३ जुलैला संध्याकाळी आशीर्वाद समारंभ होणार आहे. या समारंभाला मोजके पाहुणे उपस्थित राहणार आहेत. १४ जुलैला रिसेप्शन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्याला मीडिया आणि फिल्म इंडस्ट्रीतील लोकांना आमंत्रित करण्यात आलं आहे.

Story img Loader