भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती, प्रसिद्ध उद्योगपती आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांची मुलगी इशा अंबानी लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. १२ डिसेंबर २०१८ रोजी इशा अंबानी आणि आनंद पिरामल विवाहबद्ध होणार आहेत. आनंद पिरामल इंटरप्रायजेसचे मालक अजय पिरामल यांचा मुलगा आहे. दीपिका-रणीवर आणि प्रियांका-निकच्या लग्नानंतर सर्वांचं लक्ष या विवाहसोहळ्याकडे लागलं आहे. अत्यंत थाटामाटात हा विवाहसोहळा पार पडणार असून उदयपूरमध्ये सेलिब्रेशनला सुरुवात झाली आहे.

लग्नाआधी उदयपूरमध्ये काही कार्यक्रम पार पडणार आहेत. 8 आणि 9 डिसेंबरला होणाऱ्या या सेलिब्रेशनची तयारी पूर्ण झाली आहे. यासाठी मुकेश अंबानी आणि निता अंबानी उदयपूरमध्ये पोहोचले आहेत. फॅशन डिझायनर मनिष मल्होत्रादेखील उदयपूरमध्ये दाखल झाला असून त्याने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत त्याच्यासोबत मुकेश अंबानी आणि निता अंबानी दिसत आहेत. 12 डिसेंबरला अंबानी यांच्या मुंबईतील निवासस्थानी अॅटिंला बंगल्यावर विवाहसोहळा पार पडणार आहे.

 

View this post on Instagram

 

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ambani family arrives in udaipur for pre wedding celebration