Ambani Family : रिलायन्स उद्योग समुहाचे प्रमुख मुकेश अंबानी हे भारताच्या उद्योग जगतातील प्रभावशाली व्यक्तींपैकी एक आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांच्या धाकट्या मुलाच्या लग्नाचा थाट संपूर्ण जगाने पाहिला. या लग्नसमारंभात येणाऱ्या पाहुण्यांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती. याशिवाय जेवणातील प्रत्येक पदार्थ नीता अंबानींनी आधीच ठरवले होते. मुकेश अंबानींचं संपू्र्ण कुटुंब शुद्ध अन्न खाण्यावर विश्वास ठेवतं. असं नीता अंबानी लग्नसोहळ्यादरम्यान म्हणाल्या होत्या. त्यामुळे रोजच्या जीवनात सुद्धा हे कुटुंबीय आवर्जून योग्य आणि सकस आहार सेवन करण्यास प्राधान्य देतात.

अंबानी कुटुंबाच्या ( Ambani Family ) जीवनशैलीची सर्वत्र नेहमीच चर्चा सुरू असते. प्रत्येकाच्या घरी दिवसाची सुरुवात चहा, कॉफी किंवा दूधाचं सेवन करून होते. अगदी याचप्रमाणे अंबानींच्या घरी देखील खास पुण्याहून दूध मागवलं जातं. पुण्याच्या भाग्यलक्ष्मी डेअरीमधून अंबानी कुटुंबीयांसाठी दूध मागवण्यात येतं. होल्स्टीन-फ्रीजियन गायींच्या दुधाचं हे कुटुंब सेवन करतं. पुण्यातील भाग्यलक्ष्मी डेअरीच्या ३५ एकर परिसरात एकूण ३ हजारांहून अधिक गायी आहेत. या डेअरीचे मालक देवेंद्र शहा आहेत. त्यांच्या दुग्धशाळेत गायींची खूप चांगली काळजी घेतली जाते. यामध्ये केरळवरून मागवण्यात आलेल्या रबर कोटेड असलेल्या गाद्यांवर गायींनी झोपणं, गायींना केवळ RO-फिल्टर केलेलं पाणी पिण्यास देणं या सगळ्याचा समावेश आहे.

Navi Mumbai Polices Cyber Squad uncovered major online fraud gang during a Rs 10 lakh investigation
बनावट कागदपत्रांव्दारे बॅंकखाते बनविणारी टोळी गजाआड, नवी मुंबईच्या सायबर पथकाची कारवाई 
24th October 2024 Horoscopes In Marathi
24 October Horoscope : गुरुपुष्यामृत योग कोणत्या राशींसाठी…
womens in tribal and remote areas,
आईपण नको रे देवा?
Malad Road rage mns activist Akash Maeen death
Malad Road Rage: ‘आमच्या डोळ्यादेखत त्याला जीवे मारलं’, मनसे कार्यकर्ता आकाश माईनच्या आईनं व्यक्त केला आक्रोश
village is changing but the question is the direction of the change
गाव बदलत आहे… प्रश्न आहे बदलाच्या दिशेचा
agriculture benefit for traders and sellers in rbi report
शेती शेतकऱ्यांच्या नव्हे व्यापारी, विक्रेत्यांच्या फायद्याची ? जाणून घ्या, रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या अहवालातील धक्कादायक माहिती
Narendra Modi assertion that children from poor middle class families will fulfill their dreams of becoming doctors Mumbai print news
गरीब, मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलांचे डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण करणार; नरेंद्र मोदी
Tourism to Prosperity Nifty India Tourism Index print eco news
पर्यटनातून समृद्धीकडे…:  निफ्टी इंडिया टुरिझम इंडेक्स

हेही वाचा : काय गं सखू, बोला दाजिबा! दादा कोंडकेंच्या सुपरहिट गाण्यावर प्रथमेश परबचा मॉडर्न अंदाज; सोबतीला आहे पत्नी, पाहा व्हिडीओ

गायींची घेतली जाते विशेष काळजी

होल्स्टीन-फ्रीजियन गायींच्या वासराचं वजन साधरणत: ४० ते ५० किलो असतं. तर याच्या प्रौढ गायीचं वजन ६८० ते ७७० किलो असतं. या गायींमध्ये दररोज २५ लिटर दूध देण्याची क्षमता असते. या डेअरीमधील एक लिटर दुधाची किंमत अंदाजे १५२ रुपये आहेत. याशिवाय या फार्ममध्ये (भाग्यलक्ष्मी डेअरी फार्म) राहणाऱ्या गायींसाठी एसी बसवण्यात आले आहेत. त्यांना आंघोळ करण्यासाठी मल्टीजेट शॉवरची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यांना स्पेशल ओट्स, कापूस बियाणे, अल्फा ग्रास असे उच्च प्रथिनेयुक्त पदार्थ खायला दिले जातात.

हेही वाचा : “अविच्या नावावरचं पहिलं घर…”, ऐश्वर्या नारकरांनी दाखवली नव्या फ्लॅटची झलक, पतीसाठी लिहिली खास पोस्ट, म्हणाल्या…

होल्स्टीन-फ्रीजियन गायींची ही जात मूळची नेदरलँडची आहे. याशिवाय जगात सर्वाधिक दूध देणाऱ्या गायी म्हणून यांना ओळखलं जातं. या गायी मुख्यत: पांढऱ्या रंगाच्या असतात. या गायींच्या दुधापासून प्रथिने आणि बटरफॅट मोठ्या प्रमाणात मिळतात. त्यामुळेच अंबानी कुटुंबीय दैनंदिन वापरासाठी खास पुण्याहून या गायींचं दूध मागवतात.

अंबानी कुटुंबाप्रमाणेच ( Ambani Family ) अमिताभ बच्चन, सचिन तेंडुलकर, अक्षय कुमाल, हृतिक रोशन या सेलिब्रिटींच्या घरी सुद्धा हेच दूध मागवलं जातं.