Anant Ambani And Radhika Merchant Wedding : अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांचा शाही विवाहसोहळा आज ( १२ जुलै २०२४ ) पार पडणार आहे. या लग्नसोहळ्यासाठी खास देश-विदेशातील पाहुणे भारतात दाखल झाले आहेत. याशिवाय या लग्नसोहळ्याला बॉलीवूडकरांची मांदियाळी सुद्धा पाहायला मिळेल. सध्या सर्वत्र अंबानींच्या घरच्या लग्नकार्याची चर्चा चालू आहे. यासाठी मुंबईत वाहतूक मार्गात देखील बदल करण्यात आले आहेत. आता अनंत-राधिकाच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर केव्हा समोर येणार याबद्दल प्रत्येकाच्या मनात उत्सुकता निर्माण झालेली आहे. अशातच अंबानींची होणारी सून आता लग्नमंडपाच्या दिशेने मार्गस्थ झालेली आहे.

गेल्या काही दिवसांपासून मामेरू, हळद, मेहंदी, शिवपूजा, गृह शांती पूजा हे सगळे विधी अंबानींच्या राहत्या घरी म्हणजेच अँटालियावर करण्यात आले. तर, अनंत-राधिकाचं लग्न जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये पार पडणार आहे. त्यामुळे अँटालियावरून बीकेसीच्या दिशेने अंबानींची होणारी सून शुक्रवारी दुपारच्या सुमारास मार्गस्थ झाली आहे. याचा व्हिडीओ ‘विरल भय्यानी’ या पापाराझी इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे.

Asin husband Rahul Sharma
‘या’ बॉलीवूड अभिनेत्यामुळे जमलं ‘गजनी’ फेम असिनचं लग्न; तिचा पती म्हणाला, “ती खूप…”
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
actress keerthy suresh married to boyfriend antony thattil
शुभमंगल सावधान! १५ वर्षांच्या रिलेशनशिपनंतर अभिनेत्री अडकली लग्नबंधनात, फोटो केले शेअर
reelstar danny pandit got married to neha kulkarni
रीलस्टार डॅनी पंडितने केलं लग्न, त्याची ‘खऱ्या आयुष्यातील अर्धांगिनी’ पाहिलीत का?
PM Narendra Modi special Note for Kareena Kapoor and saif ali khan sons
करीना कपूर-सैफ अली खानच्या मुलांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली ‘ही’ खास भेट, अभिनेत्रीने फोटो केला शेअर
Shalva Kinjawadekar and Shreya Daflapurkar Pre Wedding Rituals
आली लग्नघटिका समीप! पार पडला ग्रहमख सोहळा, ‘शिवा’ फेम अभिनेत्याच्या होणार्‍या पत्नीने शेअर केले खास फोटो
Pimpri-Chinchwad:, Husband girlfriend beaten,
पिंपरी-चिंचवड: नवऱ्याच्या प्रेयसीला आणि मध्यस्थी करणाऱ्या महिलेला पत्नीने घडवली अद्दल; प्रकरण थेट पोलीस ठाण्यात
Deepika Padukone returns to mumbai with Baby Dua
Video: दीपिका पादुकोण तीन महिन्यांच्या लेकीला घेऊन परतली मुंबईत, दुआचा पहिला व्हिडीओ पाहिलात का?

हेही वाचा : अंबानींच्या घरी पार पडली गृहशांती पूजा; अनंत-राधिकाला पाहताच मुकेश अंबानी झाले भावुक! Inside व्हिडीओ व्हायरल

अंबानींची होणारी सून लग्नस्थळी निघाली

राधिका Lexus या आलिशान कारमधून प्रवास करत बीकेसीच्या दिशेने मार्गस्थ होत असल्याचं या व्हायरल व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. या कारला समोरुन फुलांची सजावट करण्यात आली असून, या गाडीच्या काचा शेडने झाकलेल्या होत्या. त्यामुळे राधिकाची झलक या व्हिडीओमध्ये दिसू शकली नाही. आता अंबानींची होणारी ही धाकटी सून लग्नात कसा लूक करते याची उत्सुकता सर्वांनाच आहे. यापूर्वी राधिकाने गरबा नाइट्स, संगीत, शिवपूजा, गृहशांती व हळदीला केलेले लूक चर्चेचा विषय ठरले होते. त्यामुळे आता मूळ लग्नात ही नवीन नवरी कशी सजते याची आतुरता प्रत्येकाला आहे.

हेही वाचा : Anant Ambani Wedding Live Updates: अनंत-राधिकाच्या लग्नस्थळी लोकांची गर्दी, पाहा जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरचा Video

हेही वाचा : अनंत-राधिकाच्या लग्नात ऐतिहासिक काशी शहराची प्रतिकृती! पहिली झलक दाखवत नीता अंबानी म्हणाल्या…

अनंत – राधिकाचा भव्य लग्नसोहळा १२ जुलै ते १५ जुलैपर्यंत पार पडणार आहे. यासाठी प्रियांका चोप्रा, किम कार्दशियन, युकेचे माजी पंतप्रधान बोरिस जॉनसन, सॅमसंग कंपनीचे मालक ली बायंग-चुल यांसारखे परदेशी पाहुणे भारतात दाखल झाले आहेत. याशिवाय बॉलीवूड सेलिब्रिटी आणि काही प्रमुख राजकीय मान्यवर देखील अनंत-राधिकाला आशीर्वाद देण्यासाठी मुंबईला पोहोचणार आहेत.

Story img Loader