Anant Ambani – Radhika Merchant Wedding : अनंत – राधिकाच्या शाही विवाहसोहळ्याची गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा चालू आहे. मुंबईत बीकेसी येथील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये हा लग्नसोहळा पार पडला. अनंत – राधिकाच्या लग्नाला देश- विदेशातून अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली होती. बॉलीवूडकरांसह राजकीय क्षेत्रातील दिग्गज देखील या समारंभाला उपस्थित राहिले होते.

अंबानींच्या घरच्या लग्नकार्याला शुक्रवारी ( १२ जुलै ) रात्री उशिरा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थिती लावली होती. मुख्यमंत्र्यांनी यावेळी अंबानी कुटुंबीयांची भेट घेऊन नवीन जोडप्याला पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. याशिवाय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्यांच्या पत्नी अमृता व लेक दिविजा हे तिघंही या लग्नकार्याला उपस्थित होते. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार, त्यांच्या पत्नी सुनेत्रा हे दोघं देखील या लग्नकार्यात सहभागी झाले होते.

हेही वाचा : नवरी नटली गं! नववधू राधिका मर्चंटचा पहिला फोटो आला समोर, गुजराती ‘पाणेतर’ लेहेंगा घालून सजली अंबानींची सून

अनंत – राधिकाच्या लग्नाला राजकीय क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती

पश्चिम बंगालच्या विद्यमान मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, स्मृती इराणी, अभिषेक मनु सिंघवी, अखिलेश यादव, लालूप्रसाद यादव, उद्धव ठाकरे, सुप्रिया सुळे असे राजकीय क्षेत्रातील बरेच मान्यवर या लग्नसोहळ्याला अनंत-राधिकाला आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित होते. यांचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

मुकेश अंबानी यांनी देशासह विदेशातील अनेक मान्यवरांना या लग्नसोहळ्याचं खास निमंत्रण पाठवलं होतं. यानुसार किम कार्दशियन, युकेचे माजी पंतप्रधान बोरिस जॉनसन, सॅमसंग कंपनीचे मालक ली बायंग-चुल असे परदेशातील अनेक मान्यवर या लग्नसोहळ्यासाठी मुंबईत दाखल झाले आहेत.

दरम्यान, गुजरात येथील जामनगर व इटलीच्या क्रुझवर अनंत- राधिकाचे दोन प्री-वेडिंग पार पडले होते. यानंतर मुंबईत अँटालिया या निवासस्थानी अनंत-राधिकाच्या लग्नाआधीचे हळद, संगीत, मेहंदी, शिवपूजा, गृहशांती पूजा असे अनेक विधी आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमांना अनेक बॉलीवूड कलाकार उपस्थित राहिल होते. या सगळ्या कार्यक्रमांनंतर अनंत-राधिकाचा शाही विवाहसोहळा आज ( १२ जुलै ) थाटामाटात पार पडला आहे. आता शनिवारी १३ जुलैला नवीन जोडप्याला शुभाशीर्वाद देण्याचा कार्यक्रम होईल. यानंतर रविवारी १४ जुलैला लग्नाच्या रिसेप्शनचं आयोजन करण्यात आलं आहे.

हेही वाचा : अंबानींच्या लग्न सोहळ्याला पतीसह पोहोचली प्रियांका चोप्रा! फोटो काढताना निक जोनसने केलं असं काही…; सर्वत्र होतंय कौतुक

दरम्यान, अंबानींच्या घरच्या लग्नसोहळ्याला दीपिका पदुकोण, रणवीर सिंह, अर्जुन कपूर, जान्हवी – खुशी, सारा अली खान, अनन्या पांडे, आलिया – रणबीर, सिद्धार्थ कियारा, माधुरी दीक्षित, रितेश जिनिलीया, विकी कतरिना, शाहरुख – गौरी, आयरा खान – नुपूर अशा बऱ्याच बॉलीवूडकरांनी उपस्थिती लावली होती.

Story img Loader