गेल्या वर्षी हॉलिवूडमधील एका पती-पत्नीचा घटस्फोटाचा खटला चांगलाच गाजला. हॉलिवूड स्टार जॉनी डेप आणि त्याची पूर्वाश्रमीची पत्नी अभिनेत्री अँबर हर्ड यांचा सेलेब्रिटी खटला लाइव्ह दाखवण्यात आला होती. हा खटला जॉनीने जिंकला व अँबर हर्डने जॉनीला नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले होते. यानंतर जॉन त्याच्या कामात व्यग्र झाला, तर दुसरीकडे अँबरने हॉलिवूड सोडल्याची बातमी आली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गौतमी पाटीलचं जन्म नाव वेगळंच; वडिलांचा मोठा दावा, म्हणाले…

अँबर हर्डचे जवळचे मित्र आणि नातेवाईक यांच्या हवाल्याने अँबर हर्ड हॉलिवूड सोडून स्पेनमधील माद्रिद इथं निघून गेली होती. ‘डेली मेल’च्या वृत्तानुसार अँबर हर्ड आपल्या मुलीसह स्पेनमध्ये स्थायिक झाली होती. तिने आपल्या मुलीला या सगळ्या वातावरणापासून दूर ठेवण्यासाठी निर्णय घेतल्याचं म्हटलं जात होतं. अशातच आता अँबरने स्वतः याबद्दल खुलासा केला आहे.

“ती काही…”, गौतमी पाटीलच्या डान्सवर टीका करणाऱ्यांना तिच्या वडिलांनी थेट सुनावलं

‘द इंडिपेंडंट’ने दिलेल्या वृत्तानुसार, अँबरने स्पेनमधील एका स्थानिक रिपोर्टरशी बोलताना हॉलिवूड कायमचे सोडल्याच्या दाव्याबद्दल प्रतिक्रिया दिली. अँबरने माद्रिदमधील तिच्या घराबाहेर स्थानिक पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी तिने तिला स्पेन खूप आवडतं आणि काही काळ ती तिथेच राहणार आहे, असं सांगितलं.

ती हॉलिवूड सोडणार नसून तिच्याकडे काही चित्रपटांच्या ऑफर आहेत, अशीही माहिती अँबरने दिली. तिने गेल्या वर्षी कॅलिफोर्नियातील युक्का व्हॅलीतील तिचं घर विकलं आणि नंतर ती स्पेनला राहायला गेली. सध्या ती मुलीबरोबर तिथेच राहत असून आणखी काही काळ तिथेच राहण्याच्या विचारात ती आहे.