मागच्या काही दिवसांपासून जॉनी डेप आणि अँबर हर्ड (Actors Johnny Depp and Amber Heard) सोशल मीडियावर बरेच चर्चेत आहेत. दोघांमध्ये सुरू असलेला मानहानीचा खटला काही दिवसांपूर्वीच अखेर जॉनी डेपनं जिंकला. पण यानंतर अँबरला लग्नासाठी प्रस्ताव आला आहे. सौदी अरबच्या एका व्यक्तीनं अँबरला इन्स्टाग्रामवरून लग्नासाठी प्रस्ताव पाठवला आहे. सोबतच त्यानं एक वॉइस नोटही पाठवली आहे. ज्यात त्यानं अँबरचा पूर्वश्रमीचा पती जॉनी डेपपेक्षा आपण कसे उत्तम आहोत हे सांगितलं आहे.
सौदी अरबच्या या व्यक्तीची ही वॉइस नोट सोशल मीडियावर खूपच व्हायरल होताना दिसत आहे. या नोटमध्ये तो म्हणतोय, “अँबर सर्व दरवाजे तुझ्यासाठी बंद होत आहेत. अशावेळी माझ्याव्यतिरिक्त आणखी कोणीच चांगल्याप्रकारे तुझी काळजी घेऊ शकत नाही. मी पाहिलं काही की काही लोक तुझा तिरस्कार करत आहेत, तुला धमक्या देत आहेत. त्यामुळे मी तुझ्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. देव आपल्या दोघांचं भलं करो. तू एक आशीर्वाद आहेस पण लोकांना याची जाणीव अद्याप झालेली नाही. मी तुझ्यासाठी त्या म्हाताऱ्यापेक्षा उत्तम आहे.”
अँबर हर्डला आलेल्या या लग्नाच्या प्रस्तावाच्या वॉइस नोटवर नेटकऱ्यांनी धम्माल प्रतिक्रिया दिल्या आहे. एका युजरनं लिहिलं, ‘सौदी अरबमधील व्यक्तीला अँबर हर्डशी लग्न करायचं आहे हे ऐकून धक्का बसला.’ तर दुसऱ्या एका युजरनं हे भीतीदायक असल्याचं म्हटलं आहे. तर अनेकांनी हे खूप मजेदार असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान अलिकडेच अँबर हर्डविरोधातला मानहानीचा खटला तिचा पूर्वश्रमीचा पती जॉनी डेपनं जिंकला. मात्र हा खटला मागचा काही काळ बऱ्याच वादग्रस्त कारणांनी चर्चेत राहिला होता.
जॉनी आणि अँबरच्या केसची सुनावणी ६ आठवडे चालली. या घटस्फोट प्रकरणाची जोरदार चर्चा झाल्याचं पाहायला मिळालं. या खटल्यात कोण जिंकणार, याबद्दल अंदाजही बांधले जात होते. अखेर हा खटला जॉनी डेपने जिंकला. निकालानंतर अँबर भरपाईची एवढी मोठी रक्कम भरू शकत नसल्याचं म्हटलंय. अँबरकडे जॉनीला भरपाई म्हणून देण्यासाठी पुरेसे पैसे नाहीत. न्यायालयाच्या निर्णयानंतर ती पुढे अपील करणार असल्याचेही एम्बरने म्हटले आहे. वास्तविक, बऱ्याच रिपोर्ट्समध्ये असे सांगण्यात आले आहे की अँबर हर्डची एकूण संपत्ती फक्त ८ मिलियन डॉलर म्हणजे जवळपास ६२ कोटी आहे. अशा परिस्थितीत, ती एवढी मोठी रक्कम नुकसान भरपाई देऊ शकत नाही.