हॉलिवूड अभिनेता जॉनी डेप आणि त्याची पूर्वश्रमीची पत्नी एंबर हर्ड मागच्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर सातत्याने चर्चेत आहे. या दोघांचा खटला न्यायालयात सुरू असून याच्या सुनावणीदरम्यान दोघांनीही एकमेकांवर धक्कादायक आरोप केले आहे. त्यानंतर आता दोघांच्या काही खासगी ऑडिओ क्लिप न्यायालयात ऐकवण्यात आल्या. ज्या अभिनेत्री एंबर हर्ड सातत्यानं जॉनी डेपला ‘Suck my d***’ असं सांगत असल्याचं समोर आलं आहे. दोघांच्या हिंसक सेक्स चॅट्सच्या काही ऑडिओ क्लिप सोशल मीडियावरही व्हायरल झाल्या आहेत. याशिवाय आणखी एका रोकॉर्डिंगमध्ये एंबरनं जॉनी डेपवर तिची मुलं लीली रोझ आणि जॅक यांना आपल्या विरोधात भडकवल्याचा आरोपही केला आहे.
अभिनेत्री एंबर हर्ड आणि जॉनी डेप यांचा मानहानीचा खटला मागच्या काही दिवसांपासून फेअरफॅक्स, व्हर्जिनिया न्यायालयात सुरू आहे. १६ मे २०२२ रोजी झालेल्या सुनावणीत न्यायाधीशांनी सहा मिनिटांच्या क्लिपसह अनेक ऑडिओ रेकॉर्डिंग्ज ऐकल्या, ज्यामध्ये जॉनी डेप आणि त्याची पूर्वश्रमीची पत्नी, एंबर हर्ड दोघेही एकमेकांवर संतापलेले असल्याचं दिसून आलं. त्यांच्या बिघडलेल्या नात्याबद्दल दोघांमध्ये वाद झाले आणि शेवटी त्यांनी एकमेकांचा अपमान केला. ‘न्यूयॉर्क पोस्ट’नुसार या ऑडिओ क्लिपमधेय एंबर सातत्यानं जॉनी डेपला ‘Suck my d***’ असं म्हणत असलेली ऐकायला मिळालं.
याशिवाय न्यायालयात ऐकवण्यात आलेल्या आणखी एका ऑडिओ क्लिपमध्ये एंबर हर्ड तिचा पूर्वश्रमीचा पती जॉनी डेपवर मुलं लीली आणि जॅक रोझ यांना तिच्याविरोधात भडकवल्याचा आरोप केला आहे. लीली आणि जॅक ही दोन्ही मुलं जॉनी डेप आणि त्याची पूर्वश्रमीची गर्लफ्रेंड व्हेनेसा पॅराडिसची आहेत. जॉनी आणि व्हेनेसा एकमेकांना १९९८ ते २०१२ पर्यंत डेट करत होते. मात्र त्यांनी लग्न केलं नव्हतं.
आणखी वाचा- जयेशभाई नाही ‘धर्मवीर’ जोरदार; बॉक्स ऑफिसवरील कमाई पाहिली का?
काय आहे वाद
जॉनी आणि एम्बर हर्डचा २०१७ मध्ये घटस्फोट झाला, परंतु त्यानंतरही या पूर्वाश्रमीच्या जोडप्यामधील तणाव कमी झाला नाही. नुकत्याच झालेल्या न्यायालयीन खटल्याकडे पाहता दोघांमधील भांडण वाढत चालले आहे. आरोप-प्रत्यारोपांचा ओघ सुरूच असून दोघेही एकामागून एक धक्कादायक खुलासे करत आहेत.
घटस्फोटानंतर एम्बर हर्डने दावा केला होता की जॉनी डेप दारूच्या नशेत तिला मारहाण करायचा. मात्र जॉनी डेपने हे आरोप फेटाळून लावले. २०१८ मध्ये एम्बर हर्डने मध्ये वॉशिंग्टन पोस्टमध्ये एक ओपिनियन पोस्ट लिहिली होती. ज्यामध्ये त्याने स्वत:ला घरगुती हिंसाचारातून वाचले असल्याचं तिनं सांगितलं होतं. हर्डने त्यात जॉनी डेपचे नाव घेतले नाही, पण ती त्याच्याकडे बोट दाखवत असल्याचे दिसून आले. जॉनी डेपलाही याची जाणीव झाली आणि त्यांनी एम्बर हर्डवर मानहानीचा खटला दाखल केला.