‘पायरेट्स ऑफ द कॅरेबियन’ चित्रपट अभिनेता जॉनी डेप त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. पूर्वाश्रमीची पत्नी अँबर हर्डच्या विरोधात जॉनीने पुन्हा एकदा कोर्टात मानहानीचा अर्ज दाखल होता, त्यामुळे ते दोघेही सातत्याने चर्चेत आहेत. दरम्यान, हा मानहानीचा खटला जॉनी डेपने जिंकला आहे. त्यामुळे आता अँबर हर्डला जॉनी डेपला १५ मिलियन डॉलर म्हणजे ११६ कोटी रुपये नुकसान भरपाई म्हणून द्यावे लागणार होते. पण जेवढे दिवस हा खटला सुरु होता तितके दिवस सगळ्यांच्या नजरा त्यावर खिळल्या होत्या. पण आता अचानक अँबर म्हणाली की पूर्वाश्रमीचा पती जॉनीवर ती मनापासून प्रेम करते.
जॉनी डेपने खटला जिंकल्यानंतर अँबरने एनबीसीला मुलाखत दिली होती. यावेळी अँबर म्हणाली, तिचे त्याच्यावर खूप प्रेम होते आणि त्यांच नातं टिकवून ठेवण्यासाठी त्यांनी खूप काही केलं. मी त्याच्यावर प्रेम करते. मी त्याच्यावर मनापासून प्रेम करायचे. आमचं नातं तुटायला नको यासाठी मी पूर्ण प्रयत्न केले पण मी त्यात यशस्वी होऊ शकली नाही.
आणखी वाचा : सोनम कपूरच्या बेबी शॉवरमधील गायक लियो कल्याणचा ‘तो’ फोटो पाहून नेटकऱ्यांनी केले ट्रोल, म्हणाले…
आणखी वाचा : ऐश्वर्याच्या पासपोर्टचा फोटो सोशल मीडियावर होतोय व्हायरल, नेटकरी म्हणाले…
त्याच मुलाखतीत अंबर हर्ड म्हणाली, ‘मी मरेपर्यंत माझ्या साक्षीतील प्रत्येक शब्दाला चिकटून राहीन. माझ्याकडून खूप चुका झाल्या आहेत, पण मी नेहमीच खरं बोलली आहे. वास्तविक मुद्द्यांपासून ज्युररचे लक्ष विचलित करण्यात त्याच्या वकिलाने चांगले काम केले आहे. ही आतापर्यंतची सर्वात अपमानास्पद आणि भयानक गोष्ट आहे. मी माझ्या संपूर्ण नातेसंबंधात भयानक आणि खेदजनक गोष्टी बोलल्या आहेत. मी भयंकर वागलो, स्वतःला जवळजवळ ओळखता येत नाही. मला माफ कर.’
आणखी वाचा : “आयुष्यात लाईफ पार्टनर नाही आणि आता या टप्प्यावर…”, करण जोहरने व्यक्त केली खंत
अशी झाली वादाची सुरुवात
घटस्फोटानंतर अँबर हर्डने दावा केला होता की जॉनी डेप दारूच्या नशेत तिला मारहाण करायचा. मात्र जॉनी डेपने हे आरोप फेटाळून लावले. २०१८ मध्ये अँबर हर्डने मध्ये वॉशिंग्टन पोस्टमध्ये एक ओपिनियन पोस्ट लिहिली होती. ज्यामध्ये त्याने स्वत:ला घरगुती हिंसाचारातून वाचलेले असल्याचे सांगितले होते. अँबर हर्डने त्यात जॉनी डेपचे नाव घेतले नाही, पण ती त्याच्याकडे बोट दाखवत असल्याचे दिसून आले होते. जॉनी डेपलाही याची जाणीव झाली आणि त्यांनी अँबर हर्डवर मानहानीचा खटला दाखल केला होता.