‘कहो ना प्यार है’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री अमिषा पटेलला ओळखले जाते. ती नेहमीच काही ना काही कारणांमुळे चर्चेत असते. गेल्या काही वर्षांपासून ती सिनेसृष्टीपासून दूर आहे. पण तरीही ती सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. अनेकदा विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. मात्र गेल्या काही दिवसांपासून अमिषा पटेल आणि काँग्रेसचे दिवंगत नेते अहमद पटेल यांचा मुलगा फैजल पटेल यांच्यात काहीतरी सुरु असल्याच्या चर्चा सुरु आहेत. विशेष म्हणजे फैजल पटेलने सोशल मीडियाद्वारे तिला प्रपोजही केले आहे.

अमिषा पटेल आणि फैजल पटेल यांच्यात काही तरी सुरु असल्याच्या चर्चा गेल्या ३० डिसेंबरपासून सुरु झाल्या आहेत. अमिषाने फैजलच्या वाढदिवसानिमित्त ट्विटरवर खास पोस्ट करत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. यावेळी तिने फैजलसोबचे काही फोटोही शेअर केले होते. “हॅप्पी बर्थडे माय डार्लिंग फैजल पटेल. लव्ह यू. तुझे येणारे वर्ष चांगले जावो,” अशा शब्दांत तिने फैजलला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या.

Maharashtrachi Hasyajatra Fame Prasad Khandekar share special post for wife
“चाळीतून वन रुम किचनमध्ये…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रसाद खांडेकरने बायकोसाठी केली खास पोस्ट; म्हणाला, “तुझ्या साथीने…”
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Asin husband Rahul Sharma
‘या’ बॉलीवूड अभिनेत्यामुळे जमलं ‘गजनी’ फेम असिनचं लग्न; तिचा पती म्हणाला, “ती खूप…”
sonakshi sinha reaction on pregnancy rumours
सोनाक्षी सिन्हाने गरोदर असल्याच्या अफवांवर दिली प्रतिक्रिया; म्हणाली, “लोक वेडे…”
sridevi akshay kumar
“अक्षय कुमारवर श्रीदेवी चिडल्या होत्या…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला किस्सा; म्हणाला, “तो घाबरायचा…”
Maharashtrachi HasyaJatra Fame shivali parab revealed her crush Rohit mane
“मला दुसरं लग्न करावं लागतंय”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील सावत्या असं का म्हणाला? जाणून घ्या…
why Shatrughan Sinha married Poonam despite his affair with Reena Roy
रीना रॉयबरोबर अफेअर असूनही पूनमशी लग्न का केलं? शत्रुघ्न सिन्हा म्हणालेले, “निर्णय घेणं…”
Anurag Kashyap Daughter Haldi Ceremony
वयाच्या २३ व्या वर्षी अनुराग कश्यपची लेक अडकणार विवाहबंधनात! हळदीला सुरुवात, होणारा जावई कोण?

अमिषाच्या या पोस्टवर फैजलनेही प्रतिक्रिया दिली होती. यावेळी त्याने तिला सोशल मीडियाच्या माध्यमातून उघडपणे प्रपोजही केले होते. “धन्यवाद अमिषा पटेल. मी तुला औपचारिकपणे सर्वांसमोर प्रपोज करत आहे. तू माझ्याशी लग्न करशील का?” असे फैजल पटेलने म्हटले आहे. दरम्यान त्याचे हे ट्वीट तुफान व्हायरल झाले होते. त्यावर अनेक प्रतिक्रिया येत होत्या. यानंतर मात्र फैजलने ट्विट डिलीट केले आहे.

या संपूर्ण प्रकरणानंतर आता नुकतंच अमिषा पटेलने या सर्व अफवांबाबत स्पष्टीकरण दिले आहे. नुकतंच अमिषाने एका प्रसारमाध्यमाला मुलाखत दिली. यावेळी तिने तिच्या आणि फैजलच्या नात्याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. यावेळी अमिषा म्हणाली की, “फैजल हा दिवंगत नेते अहमद पटेल यांचा मुलगा असून मीही एका नेत्याची मुलगी आहे. याच कारणामुळे मी आणि फैजल एकमेकांना खूप दिवसांपासून ओळखतो. आम्ही चांगले मित्र आहोत. त्याची बहीणही माझी खूप चांगली मैत्रीण आहे. त्यांनी ट्वीटरवर केलेला प्रपोज हा विनोद म्हणून केला होता. मी सिंगल आहे आणि फार आनंदी आहे.”

“आम्ही दोघेही राजकीय पार्श्वभूमीतून आलो आहोत. माझे आजोबा बॅरिस्टर रजनी पटेल यांनी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यासोबत काम केले होते. तर फैसलचे वडील अहमद पटेल यांनी सोनिया गांधींसोबत काम केले आहे. आमचे कुटुंब गेल्या तीन पिढ्यांपासून एकमेकांना ओळखतात. याच कारणामुळे मी फैजलचे वडील अहमद अंकल यांच्या खूप जवळ होते. फैजल आणि माझ्या अनेक कॉमन मित्र आहेत,” असेही अमिषा म्हणाली.

“मी अविवाहित आहे आणि भविष्यात लग्न करण्याचा माझा कोणताही विचार नाही. एखाद्या नात्यात आल्यानंतर तुम्ही भावनिकदृष्ट्या खूप खचून जाता, असा माझा विश्वास आहे. या सगळ्यासाठी माझ्याकडे वेळ नाही,” असेही तिने सांगितले.

“…पण तू मला जिवंत केलंस!”; पडद्यावर सिंधुताई साकारणाऱ्या तेजस्विनी पंडितने व्यक्त केल्या भावना

दरम्यान लवकरच ती सनी देओल आणि उत्कर्ष शर्मासोबत ‘गदर’ या सुपरहिट चित्रपटाच्या सिक्वेलमध्ये दिसणार आहे. याशिवाय ती अर्जुन रामपाल आणि डेजी शाहसोबत ‘मिस्ट्री ऑफ टॅटू’ या चित्रपटातही झळकणार आहे.

Story img Loader