अभिनेता संदीप पाठकच्या ‘वऱ्हाड निघालंय लंडनला’ या नाटकाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. लक्ष्मणराव देशपांडे लिखित ‘वऱ्हाड निघालंय लंडनला’ नाटकात संदीप ५२ व्यक्तिरेखा एकटा लीलया निभावत आहे. या नाटकातील त्याच्या अभिनयाचं चहूबाजूने कौतुक होतं आहे. सध्या ‘वऱ्हाड निघालंय लंडनला’ नाटकाचा अमेरिका दौरा सुरू आहे. या दौऱ्यातील प्रयोगाला देखील हाउसफुल्ल प्रतिसाद मिळत आहे. याचे फोटो, व्हिडीओ संदीप पाठक सोशल मीडियावर शेअर करत आहे.
काही दिवसांपूर्वीच अमेरिकेतील न्यूजर्सी येथे ‘वऱ्हाड निघालंय लंडनला’ नाटकाचा ५५०वा प्रयोग झाला. हा प्रयोग सुद्धा हाउसफुल्ल झाला होता. नुकताच संदीप पाठकने एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ९० वर्षांच्या आजी ‘वऱ्हाड निघालंय लंडनला’ नाटक पाहण्यासाठी एका तासाचा प्रवास करून आल्या होत्या. यावेळी त्यांनी संदीप पाठकचं भरभरून कौतुक केलं.
हेही वाचा – “पाच वर्ष सुरू असलेला हा प्रवास…”; ‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्रीची भावुक पोस्ट, म्हणाली, “लॉकडाऊनमध्ये…”
“९० वर्षांच्या सुमन आजींचे आशीर्वाद मिळाले अजून काय हवं एका कलाकाराला…”, असं कॅप्शन लिहित संदीप पाठकने आजींबरोबरचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये संदीप म्हणतोय, “मी आता डेलावेअरमध्ये ५५१वा प्रयोग संपवला आणि बाहेर जेव्हा आलो तेव्हा मला सुमन आजी भेटल्या. वय वर्ष ९० आहे. ९०व्या वर्षीय आजी एक तासाचा प्रवास करून इथे आलेल्या आहेत. माझं नाटक बघितलं. त्यांना खूप आवडलं.” पुढे आजी म्हणाल्या की, नाटक खूप आवडलं. तुमचा अभिनय म्हणजे उत्तम आहे. त्यानंतर संदीप त्यांना म्हणाला, “मला खूप छान वाटलं. एवढं सगळं इतक्या वयात, तुम्ही मला आशीर्वाद द्यायला आल्या आहात.” म्हणत संदीप आजींच्या पाया पडताना दिसत आहे. यावेळी आजी संदीपला आशीर्वाद देत म्हणतात, “तुमची अशीच प्रगती होवो. तुमचा अभिनय बघून हसू येतं.”
हेही वाचा – Video: केळवणासाठीची रेश्मा शिंदेची हटके एन्ट्री पाहिलीत का? आशुतोष गोखलेने व्हिडीओ केला शेअर
दरम्यान, संदीप पाठकच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, ‘वऱ्हाड निघालंय लंडन’ व्यतिरिक्त संदीपची ‘कलर्स मराठी’ वाहिनीवर मालिका सुरू आहे. ‘इंद्रायणी’ मालिकेत संदीप पाहायला मिळत आहे. या मालिकेत त्याने अंताजीची भूमिका साकारली आहे. तसंच काही महिन्यांपूर्वी संदीप ‘अल्याड पल्याड’ चित्रपटात झळकला होता. या चित्रपटात संदीपसह मकरंद देशपांडे, गौरव मोरे, सक्षम कुलकर्णी असे तगडे कलाकार मंडळी होते.