हॉलीवूड मनोरंजनसृष्टीत एक उत्तम अभिनेता म्हणून नावाजलेले अॅडम वेस्ट यांचे वयाच्या ८८व्या वर्षी निधन झाले आहे. सत्तरपेक्षा जास्त चित्रपट आणि दूरदर्शन मालिकांतून अभिनय करणाऱ्या अॅडम यांनी १९५७ साली ‘वूडू आइसलॅण्ड’ या चित्रपटातून अभिनयक्षेत्रात पदार्पण केले. आपल्या दर्जेदार अभिनयाच्या जोरावर ‘मेयर वेस्ट’, ‘कॉलनेल डॅन’, ‘कॅटमॅन’ यांसारख्या अनेक व्यक्तिरेखा त्यांनी गाजवल्या आहेत. १९६० साली ‘डीसी एक्स्टेंडेड युनिव्हर्स’ निर्मित ‘बॅटमॅन’ या लोकप्रिय दूरदर्शन मालिकेतून ते खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आले. आज विसाव्या शतकात एखादा सुपरहिरो साकारण्यासाठी थ्रीडी अॅनिमेशन आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. परंतु १९६० साली अॅडम वेस्ट यांनी अत्यल्प तंत्रज्ञानात उत्कृष्ट अभिनयाच्या जोरावर ‘बॅटमॅन’ हा सुपरहिरो प्रेक्षकांसमोर उभा केला. ते सुपरहिरोच्या भूमिकेत इतके चपखल बसले की त्यानंतर ‘मायकल केटन’, ‘क्रिश्चियन बेल’ या अभिनेत्यांनी जेव्हा बॅटमॅन साकारला तेव्हा त्याची तुलना प्रेक्षक अॅडम यांनी साकारलेल्या बॅटमॅनशी करू लागले. पुढे वाढत्या वयाबरोबर त्यांच्या अभिनयातील दरारा काहीसा कमी होत गेला, परंतु त्यांनी दिग्दर्शन क्षेत्रातही कसब आजमावले. काही वर्षांपूर्वी त्यांना ‘ल्यूकेमिया’ नामक कर्करोगाची लागण झाली. यांत रक्तातील पांढऱ्या पेशींचे प्रमाण हळूहळू कमी होत जाते. या रोगाशी त्यांनी एका सुपरहिरोप्रमाणे झुंज दिली. परंतु अखेर त्यांच्या शरीराने त्यांची साथ सोडली आणि एका गुणी कलावंताने रंगभूमीचा कायमचा निरोप घेतला.
पहिला ‘बॅटमॅन’ काळाच्या पडद्याआड
अॅडम वेस्ट यांचे वयाच्या ८८व्या वर्षी निधन झाले आहे.
Written by मंदार गुरव
Updated:
आणखी वाचा
First published on: 18-06-2017 at 00:33 IST
TOPICSमंदार गुरव
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: American actor adam west passed away first batman adam west hollywood katta part