Anant Ambani Radhika Merchant 2nd Pre-Wedding : अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांचं दुसरं प्री-वेडिंग सध्या क्रूझवर जोरदार सुरू आहे. इटली ते फ्रान्स असा प्रवास करत सुरू असलेल्या या दुसऱ्या प्री-वेडिंगचे काही फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या फोटो, व्हिडीओमधून प्री-वेडिंग होणाऱ्या आलिशान क्रूझची झलक झाली आहे. आज दुसऱ्या प्री-वेडिंगचा तिसरा दिवस असून जगप्रसिद्ध अमेरिकन गायिका कॅटी पेरी आज परफॉर्म करणार असल्याचं समोर आलं आहे.

काही वृत्तांनुसार, अमेरिकन गायिका कॅटी पेरी अनंत व राधिकाच्या दुसऱ्या प्री-वेडिंगमध्ये आज परफॉर्म करणार आहे. फ्रान्समधील ५०.९ मिलियन अमेरिकन डॉलर म्हणजे जवळपास ४२४ कोटींच्या व्हिलामध्ये कॅटी पेरी तिच्या गाण्यांनी धुमाकूळ घालणार आहे.

Infosys Q3 Results Highlight: Net profit rises 11 percent
इन्फोसिसला ६,८०६ कोटींचा तिमाही नफा; ११ टक्क्यांची अपेक्षेपेक्षा सरस वाढ
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
drug, Nagpur , drug addiction, narcotics ,
नागपूर शहर बनले नशाखोरीचे केंद्र, वर्षभरात ३ कोटींचे अंमली पदार्थ जप्त
Chandrapur marathi news
चंद्रपूर : सफाई कामगार, शिल्पनिदेशक पदांसाठी ३५ हजारांची लाच, मनुष्यबळ पुरवठा करणाऱ्या…
tur dal price , tur dal price sangli , tur dal,
तूरडाळ सामान्यांच्या आवाक्यात !
Athavale claim chairman of trust running Siddharth college
‘पीपल्स’च्या अध्यक्षपदावर रामदास आठवले यांचा दावा; जुन्या इमारतीच्या नूतनीकरणासाठी ५०० कोटींच्या निधीची मागणी
case filed against entertainment company owner for unpaid dues of 1 25 crore rupees
पंचतारांकीत हॉटेलमध्ये पार्टी आयोजित करून सव्वा कोटी थकवले
Chandrapur, bribe, police sub-inspector,
चंद्रपूर : ५० हजाराची लाच, पोलीस उपनिरीक्षक प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

हेही वाचा – Video: ‘ठरलं तर मग’ फेम अमित भानुशालीचा लेक दवाखान्यात अचानक गाऊ लागला ‘आमच्या पप्पांनी गणपती आणला’ गाणं, पाहा व्हिडीओ

‘द सन यूके’च्या वृत्तानुसार, कॅटी पेरीला ‘ले मास्करेड’मध्ये परफॉर्मन्ससाठी अंबानी कुटुंबाकडून लाखो डॉलरचा चेक मिळाला आहे. कॅटी खासगी कार्यक्रमांमध्ये परफॉर्म करण्यासाठी १२ ते १६ कोटी मानधन घेते. त्यानुसार तिला अंबानींकडून मानधन मिळाल्याचं म्हटलं जात आहे.

एका सूत्राच्या माहितीनुसार, कान्समध्ये एका मोठ्या कार्यक्रमासाठी ८०० पाहुणे क्रूझमधून उतरणार आहेत. या कार्यक्रमाच्या थीमचं नाव ‘ला वीटा इ अन वियाजिओ’ असं आहे. ५ तासांच्या कार्यक्रमामध्ये कॅटी पेरी परफॉर्म करणार असून त्यानंतर सर्व पाहुणे पुढच्या कार्यक्रमासाठी रवाना होणार आहेत.

अनंत-राधिकाचं दुसरं प्री-वेडिंग ज्या क्रूझवर होतं आहे, त्याची किंमत जवळपास ७ हजार ५०० कोटी रुपये आहे. कूझवर स्पा, जिम, स्विमिंग पूल अशा अनेक सुविधा आहेत; ज्याची किंमत ६० लाख आहे.

हेही वाचा – “बाळा, तुला जाऊन ७३० दिवस…” सिद्धू मुसेवालाच्या आईची भावुक पोस्ट, म्हणाल्या, “शत्रूंनी माझा एकुलता एक…”

दरम्यान, अनंत-राधिकाच्या दुसऱ्या प्री-वेडिंगच्या पहिल्या २९ मे ला लोकप्रिय अमेरिकन बँड, बॅकस्ट्रीट बॉइजने कूझवर परफॉर्म केला. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतं आहे. या व्हिडीओमध्ये बँडमधील निक कार्टर, होवी डोरो, ब्रायन लिट्रेल, एजे मॅकलीन आणि केविन रिचर्डसन पांढऱ्या रंगाच्या कपड्यात दिसत असून त्यांचं सुपरहिट गाणं ‘आय वांट इट दैट वे’वर परफॉर्म करताना पाहायला मिळत आहेत.

अनंत-राधिकाच्या पहिल्या प्री-वेडिंगमध्ये रिहाना, दिलजीत दोसांझ, अरिजीत सिंह, श्रेया घोषाल आणि इतर गायकांनी परफॉर्मन्स केला होता. या गायकांच्या तालावर सेलिब्रिटी जबरदस्त थिरकले होते. याचे व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते.

Story img Loader