हॉलीवूडमध्येही आपल्या बॉलीवूडमधील साचेबद्ध आसूडपटांची नक्कल वाटावी असे चित्रपट अधूनमधून नाही, तर अनेकदा आलेले आहेत. आपल्या वितरकांच्या आणि  सेन्सॉर बोर्डाच्या गाळणीतून ते बाहेर पडू शकले नाहीत इतकंच. पण त्यांना चुकवणाऱ्या अनंत मार्गातून चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहोचतातच पोहोचतात. तर इथे मुद्दा हा की १९८०-९० च्या दशकात उतारवयीन मिथून, धर्मेद्र, अमिताभ बच्चन, सनी देओल (दक्षिणेत रजनीकांत) यांची हिरोगिरी सुरकुत्यांसह पाहण्यात प्रेक्षकांना देवदर्शनाचा लाभ होत असे आणि प्रेक्षकांचा बालकबुद्धी निर्देशांक वधारण्याची स्थितीच उरत नसे. कालौघात नायकांची अँग्री ओल्डमेन ‘खाना’वळही त्यांच्या पन्नाशीत भावनाशील प्रेक्षकांचे बुद्धीशोषण करण्यात सध्या गर्क आहे. हॉकी, कुस्तीतील बारकावे अर्भकावस्था पार केलेल्या सर्वाना पाठ होतात. आता विविध खेळांचे कंगोरेदर्शन येत्या काळात चित्रपटांमुळे समाजात लोकप्रिय न झाल्यास नवल असेल. तर इथे मुद्दा इंग्लिश-िवग्लिश सिनेमांचा असल्याने बॉलीवूडी थाटाच्या सार्वकालिक चित्रपटीय ‘गूण’सूत्रांनी तयार झालेल्या ‘व्हेन्जन्स : ए लव्ह स्टोरी’ या सिनेमावर बोलायचे आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

‘व्हेन्जन्स : ए लव्ह स्टोरी’ या चित्रपटामधला व्हेन्जन्स म्हणजे सूड गमतीशीर आहे आणि इथली लव्हस्टोरी गंभीर आहे. इथला सूड कोणाचा, कोणासाठी ते कळतो. पण प्रेमकथा कुणाची, कुणासोबत याचा थांगपत्ता शेवटपर्यंत लागत नाही. म्हणजेच यातील लव्हस्टोरीचे रहस्य चित्रपट संपेपर्यंत टिकविण्यात दिग्दर्शक यशस्वी होतो आणि हिचकॉकीयन रहस्यपट काय चीज आहे, या तोऱ्यात चित्रपट घडवत ठेवतो.

जॉएस कॅरोल ओट्स यांचे कथा/कादंबऱ्यांच्या क्षेत्रातील स्थान तोलामोलाचे आहे. त्यांच्याच ‘रेप : ए लव्हस्टोरी’ या लघुकादंबरीचे हे चित्रपटीय रूपांतर. पण कादंबरीचे चित्रपटीय रूपांतरणातील वाईटोत्तम उदाहरण. यात गेल्या कैक वर्षांपासून चेहऱ्यावरच्या सुरकुत्यांची तमा न बाळगता एकामागून एक फ्लॉप सिनेमांची मालिका देणारा निकोलस केज हा पोलीस आणि नायक अशा दुहेरी भूमिकेतील एक व्यक्तिरेखा आहे. उकळीबिंदूपर्यंत हाणामारी आणि देमार दृश्यांची अपेक्षा करताना या सुरकुत्यासंपृक्त अँग्री ओल्डमॅनला पाहताना कसेसेच वाटू लागते. मग चित्रपट सुरू होतो. सुरुवातीच्या दृश्यात नायगारा धबधब्याजवळच्या शहरगावात एका दुर्घटनेत जॉन (निकोलस केज) गुन्हेगारांशी बंदुकीच्या बळावर दोन हात करताना दिसतो. या चकमकीत गुन्हेगार आणि जॉनचा सहकारी मरतो. नायकाच्या ताकदीचे प्रात्यक्षिक दाखविणारे हे चित्रपटासाठीचे निर्थक दृश्य संपताच जॉन स्थानिक बारमध्ये श्रमपरिहाराचा आस्वाद घेत असतो. तितक्यात एक ललना बारमध्ये दाखल होते. सत्शील, सुवर्तनी आणि सुदर्शनी जॉन तिच्याकडे पाहतो. हिंदी चित्रपटात नायक आणि नायिकेच्या ‘अपघाती’ भेटीदरम्यान वाजते तसले संगीत वाजू लागते. कुणीतरी या ललनेचे नाव टीना मॅग्वायर (अ‍ॅना हचिसन) असल्याचे जॉनच्या कानाजवळ येऊन सांगते आणि ती सहा वर्षीय मुलीची एकल पालक आहे या माहितीसोबत पुढील व्यक्तिवेध उलगडण्यासाठी उत्सुक असते.

अनेक निर्थक दृश्यभागांनंतर खरोखरीच दारू-ड्रग्ज नशेतील तरुणांकडून भीषण बलात्कार होतो. तिच्या सहा वर्षांच्या मुलीसमोर हे निर्घृण कृत्य घडते. मग पोलिसी कारवाई, त्यानंतर न्यायालयीन व्यवस्थेपर्यंत या प्रकरणाचा शिस्तबद्ध प्रवास सुरू होतो. हुशार आणि बेरकी वकिलामुळे न्यायालयात सर्व आरोपी निर्दोष सुटतात आणि अन्यायपीडित टीना मानसिकरीत्याही कोलमडून जाते. त्यामुळे दुरून या घटनेकडे पाहणाऱ्या जॉनच्या पोलिसातील माणूसपण खडबडून जागे होते आणि कायदा हातात घेताना ‘कुत्ते-कमीने, मैं तेरा खून पी जाऊंगा’ या हिंदी सूडाच्चारांचाच तेवढा वापर न करता एकेका गुन्हेगारास टिपण्यास तो सज्ज होतो.

जॉन या नायकासह एकाही व्यक्तिरेखेला फुलू न देण्याचे जानी मार्टिन यांचे इथले दिग्दर्शकीय ‘कौशल्य’ केवळ अनुभवण्याजोगे आहे. शेकडो लोकप्रिय सिनेमांचे स्टंटसीन आखणाऱ्या या कलाकाराकडे चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी आल्यानंतर त्यांनी या गंभीर विषयातच मुबलक स्टंटबाजी केलेली दिसते. परिणामी नायिकेवरील अन्याय, जॉनसमोर हतप्रभ किंवा गलितगात्र होत जाणारा खलनायकांचा ताफा, नायिकेच्या पीडितप्रवण लहान मुलीचे नायक जॉनशी न घडू शकलेले मैत्रीचे अवघड नाते आणि एकूण या सगळ्या प्रकारात कथानकातील परिस्थिती आणखी विनोदी करून सोडणारी पाश्र्वसंगीताची गंभीर कामगिरी यांनी चित्रपट भैरवीकडे वळू लागतो.

तरीही ‘व्हेन्जन्स : ए लव्ह स्टोरी’ मुद्दाम पाहावा असा अमेरिकी सिनेमा आहे. हिंदूी चित्रपटातील सूडाची परंपरा अभंग आहे. नेहमीच खूप चांगले चित्रपट पाहणाऱ्या आपल्याकडच्या दर्दी चित्रपट रसिकांना त्यातले आखूडपणाचे गुणधर्म पडताळून पाहण्यासाठी हा चित्रपट मदत करू शकेल. त्यातून या चित्रपटकर्त्यांच्या पुण्यकर्मात वाढ होण्याचे नवल तरी साधले जाईल.

पंकज भोसले pankaj.bhosale@expressindia.com