सध्या महाराष्ट्राचे राजकीय वातावरण तापले आहे. शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे हे यांच्यासह जवळपास ४० आमदारांनी बंड केल्यानंतर राज्यात नाट्यमय घडामोडी घडत आहेत. सर्वोच्च न्यायालयाने शिंदे गटाला सध्यातरी अभय दिले असून येत्या १२ जुलैपर्यंत अपात्रतेची कोणतीही कारवाई करु नये, असे राज्य सरकारला सांगितले आहे. तसेच सुप्रीम कोर्टाने विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, प्रतोद सुनील प्रभू आणि नव्याने नियुक्ती झालेले गटनेते अजय चौधरी यांना नोटीस पाठवली आहे. पाच दिवसात त्यांना प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगण्यात आलं आहे. ११ जुलैला यासंदर्भात पुढील सुनावणी होणार आहे. या सर्व घडामोडी घडत असताना आता मनसेचे नेते अमेय खोपकरांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत ‘धर्मवीर’ चित्रपटातील एका सीन विषयी वक्तव्य केले आहेत.
आणखी वाचा : “शरद पोंक्षे कधीही काहीही विसरत नाही”, आदेश बांदेकर यांच्या पोस्टवर अभिनेत्याचे सडेतोड उत्तर
अमेय खोपकर यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून दोन पोस्ट शेअर केल्या आहेत. या पोस्टमध्ये ते धर्मवीर चित्रपटात आनंद दिघे रुग्णालयात असताना राज ठाकरे आणि त्यांच्या भेटीविषयी बोलले आहेत. यावेळी अमेय यांनी दोन व्हिडीओ देखील शेअर केले आहेत. एका व्हिडीओत ‘धर्मवीर’ चित्रपट चित्रपटगृहात पाहत असताना आनंद दिघे आणि राज ठाकरे यांच्यात एक संवाद झाल्याचे पाहायला मिळाले. या व्हिडीओत राज ठाकरे आनंद दिघेंना म्हणताता, “अहो धर्मवीर अजून हिंदुत्वाचं काम सर्वत्र पोहोचलेलं नाही.” यावर आनंद दिघे राज ठाकरेंना म्हणतात, “ती जबाबदारी आता तुमच्या खांद्यावर आहे.” हे व्हिडीओ शेअर करत अमेय खोकपकर म्हणाले, “खालील दोन्ही व्हिडीओ काळजीपूर्वक बघा. ‘धर्मवीर’जेव्हा zee5 वर येतो तेव्हा राजसाहेबांबद्दलचं वाक्य का गायब होतं? ही उद्धव ठाकरेंची सेन्सॉरशिप नाही तर दुसरं काय? राजसाहेबांच्या लोकप्रियतेला टरकणाऱ्या शिवसेनेचा खरा चेहरा उघड झालाय.”
पाहा व्हिडीओ :
आणखी वाचा : वडील अभिषेकचा डान्स कसा वाटला? मनिष पॉलच्या प्रश्नावर आराध्याने दिले असे उत्तर
पाहा पोस्ट :
आणखी वाचा : “हॉस्पिटलमध्ये एकनाथ शिंदेंचा फोन आला, म्हणाले…”, शरद पोंक्षेंची पोस्ट चर्चेत
याशिवाय अमेय खोपकर यांनी आणखी एक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट शेअर करत “धर्मवीर आनंद दिघे यांचा आवाज दाबणाऱ्या वृत्तीचा कडक शब्दात निषेध”, असे कॅप्शन त्यांनी दिले आहे. अमेय खोपकर यांनी शेअर केलेल्या या दोन्ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाल्या आहेत.
आणखी वाचा : ठाणे: उद्धव ठाकरे येण्याचे कळताच शिंदे गटाकडून आनंद आश्रम हायजॅकचा प्रयत्न
एकनाथ शिंदे यांचा राज ठाकरेंना फोन
सध्या एकनाथ शिंदे यांनी आपला गट कोणत्याही पक्षात विलीन केलेला नाही. अजूनही आम्ही कोणत्या पक्षात सामील झालेलो नाही. आम्ही शिवसेनेतच राहणार, असे बंडखोर आमदारांकडून सांगितले जात आहे. असे असताना शिंदे यांनी राज ठाकरे यांना एकूण दोन वेळा भ्रमणध्वनीवरुन संपर्क साधला आहे. या फोन कॉलमध्ये काही राजकीय चर्चा झाल्याचेही सांगण्यात येत आहे. तसेच यावेळी एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंच्या प्रकृतीची चौकशी केली.