दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी आणि अभिनेता अमेय वाघ यांनी सुरू केलेल्या ‘कास्टिंग काऊच’ या वेबमालिकेत लवकरच ‘सैराट’ची टीम पाहायला मिळणार आहे. ‘सैराट’मधील स्टारकास्ट परशा अर्थात आकाश ठोसर आणि आर्ची म्हणजेच रिंकू राजगुरू यांच्यासोबतचा ‘कास्टींग काऊच’चा टीझर अमेय आणि निपुणच्या ‘भारतीय डिजिटल पार्टी’ या त्यांच्या यूट्युब चॅनलवर प्रदर्शित झाला आहे. अमेयने आपल्या ट्विटर अकाऊंटवर देखील या व्हिडिओची लिंक ट्विट केली आहे.

पहिली मराठी वेबमालिका असलेल्या ‘कास्टिंग काऊच’चे आजवर तीन भाग प्रदर्शित झाले आहेत. एकाच ‘काउच’वर बसून नटय़ांशी झालेला अनौपचारिक संवाद साधत हे दोघे धमाल उडवून देतात. एका चित्रपटासाठी अभिनेत्रीला कास्ट करण्याच्या धडपडीमुळे याला ‘कास्टिंग काऊच’ नाव देण्यात आले आहे. पहिल्या एपिसोडमध्ये राधिका आपटे त्यानंतर दुसऱ्या एपिसोडमध्ये श्रिया पिळगांवकर आणि आता तिसऱ्या कार्यक्रमात दिल दोस्ती दुनियादारीतील सखी गोखले, पूजा ठोंबरे आणि स्वानंदी टिकेकर या तिघी उपस्थित होत्या. आता ‘सैराट’च्या टीमसोबत नेमकं ‘कास्टिंग काऊच’चा एपिसोड कसा रंगणार, निपुण आणि अमेय काय धम्माल उडवणार याकडे साऱयाचे लक्ष लागून आहे.

Story img Loader