मराठीतील युवा अभिनेता अमेय वाघ आपल्या चाहत्यांना एकामागून एक आश्चर्याचे धक्के देत आहे. काही दिवसांपूर्वी अमेयने सोशल नेटवर्किंग साईटद्वारे, लवकरच निगेटिव्ह भूमिकेतून झळकणार असल्याची माहिती दिली होती. या बातमीची चर्चा होत असतानाच, त्याने आणखी एका नव्या प्रोजेक्टबद्दल सांगत त्याच्या चाहत्यांना खुश केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

अमेय लवकरच एका सुप्रसिद्ध हिंदी वेब सीरिजमधून प्रेक्षकांसमोर येत आहे. डिंग इंटरटेंटमेंट निर्मित आणि अनिरुद्ध सेन दिग्दर्शित ‘असुरा’ असे त्याचे नाव असून, वूट अॅपवर प्रदर्शित होणारी हि एक थ्रिलर गोष्ट आहे. विशेष म्हणजे, अमेयची यात महत्वपूर्ण भूमिका असून, तो पहिल्यांदाच अशा थ्रिलर वेब सीरिजमध्ये काम करताना दिसून येणार आहे.

Video : उगाच आडकाठी आणू नका; प्रवीण तरडे सेन्सॉरवर संतापले

हिंदीच्या नावाजलेल्या कलाकारांचा समावेश असलेल्या या वेब सीरिजमध्ये बॉलिवूड अभिनेता अर्शद वारसीची प्रमुख भूमिका आहे. ‘असुरा’ या वेब सीरिजच्या निमित्ताने अर्शदसोबत काम करण्याची संधी अमेयला मिळणार असल्याने तो देखील खूप उत्सुक आहे. इतकेच नव्हे तर, नवीन वर्षाच्या सुरुवातीला प्रेक्षकांच्या भेटीस येत असलेल्या या वेब सीरिजनंतर, अमेयकडे त्याच्या चाहत्यांसाठी आणखी एक मोठे सरप्राईज आहे. मात्र ते काय आहे, हे जाणून घेण्यासाठी थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे.