अभिनेता अमेय वाघने मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीत स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. सोशल मीडियावर अभिनेता कायम सक्रिय असतो. अलीकडे अमेय त्याच्या ‘असुर’ या वेब सीरिजमुळे चांगलाच चर्चेत आहे. दरम्यान, अभिनेत्याने २०१७ मध्ये त्याची बालमैत्रीण आणि प्रेयसी साजिरी देशपांडे हिच्याशी पुण्यात लग्नगाठ बांधली होती. आज अमेयच्या लग्नाला सहा वर्ष पूर्ण झाल्याने अभिनेत्याने खास इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करत बायकोला शुभेच्छा दिल्या आहेत.

हेही वाचा : महाराष्ट्रातील राजकीय भूकंपावर शरद पोंक्षेंनी मांडले परखड मत; पोस्ट शेअर करत म्हणाले, “शब्द आज वारले”

Premachi Goshta Fame Rajas Sule went on trip to new zealand with wife after wedding 19 days
लग्नाच्या १९ दिवसांनंतर ‘प्रेमाची गोष्ट’ फेम अभिनेता ‘या’ देशात गेला फिरायला, पत्नी फोटो शेअर करत म्हणाली…
women naga sadhu life
कसे असते महिला नागा साधूंचे जीवन? त्यांचा पेहराव…
Aai Ani Baba Retire Hot Aahet artis gave a special surprise to Nivedita Saraf on her birthday
Video: ‘आई आणि बाबा रिटायर होत आहेत’ मालिकेतील कलाकारांनी निवेदिता सराफांना वाढदिवसानिमित्ताने दिलं खास सरप्राइज, पाहा व्हिडीओ
Abhidnya bhave Anniversary Post
“My सर्वस्व मेहुल पै…”, लग्नाच्या वाढदिवशी अभिज्ञा भावेची पतीसाठी रोमँटिक पोस्ट; मराठी कलाकारांकडून शुभेच्छांचा वर्षाव
Marathi actress Shivani sonar and ambar ganpule marry soon
शिवानी सोनार-अंबर गणपुळे लवकरच चढणार बोहल्यावर; लग्नाआधीच्या विधीला झाली सुरुवात, अभिनेत्रीने शेअर केले फोटो
Marathi Actress Hemal Ingle Wedding photo
साडेसात वर्षांच्या रिलेशनशिपनंतर हेमल इंगळेने बॉयफ्रेंडशी बांधली लग्नगाठ! पती आहे कलाविश्वापासून दूर…; फोटो आले समोर
celebration 111th birthday narrow gauge Shakuntala railway
अस्तित्वहीन ‘शकुंतला’ रेल्‍वेचा वाढदिवस साजरा, दिव्यांची आरास…
shweta mehendale
Video: ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ फेम अभिनेत्रीने नवीन वर्षाचे ‘असे’ केले स्वागत; रामशेज किल्ल्यावरून पतीसह दिल्या शुभेच्छा

इन्स्टाग्रामवर व्हिडीओ पोस्ट शेअर करत अमेय वाघ लिहितो, “तुझ्या सानिध्यात कळला प्रेमाचा अर्थ खरा…असाच वाहत राहुदे आपल्या प्रेमाचा झरा ! Happy anniversary मालकीण!” या व्हिडीओमध्ये अमेय आणि त्याची बायको साजिरी एकत्र धबधब्यावर वेळ घालवताना दिसत आहेत.

हेही वाचा : “मतदात्याच्या बोटाला शाही नाही चुनाच…”, महाराष्ट्राच्या राजकारणावर ‘बिग बॉस मराठी’ फेम उत्कर्ष शिंदेने मांडले स्पष्ट मत

अमेय वाघने शेअर केलेल्या या व्हिडीओर अभिज्ञा भावे, सुरभी हांडे यांसारख्या अभिनेत्रींनी कमेंट करत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. चित्रपटसृष्टीतील काही मित्रमंडळींसह अभिनेत्याच्या असंख्य चाहत्यांनी या व्हिडीओवर प्रतिक्रिया देत अमेय-साजिरी या दोघांचेही कौतुक केले आहे.

हेही वाचा : “खेळ तर आता सुरू…”, महाराष्ट्राच्या राजकारणावर मराठी अभिनेत्याने केलेले ट्वीट चर्चेत

दरम्यान, अमेय वाघ मुख्य भूमिकेत असलेल्या ‘असूर’ या सीरिजचे पहिले पर्व २ मार्च २०२० रोजी प्रदर्शित झाले होते. त्यानंतर आता सव्वातीन वर्षांनी १ जून २०२३ रोजी याचे सीरिजचे दुसरे पर्व प्रेक्षकांच्या भेटीला आहे. या सीरिजमध्ये अर्शद वारसी, बरुण सोबती, रिद्धी डोगरा, अनप्रिया गोएंका, गौरव अरोरासह अनेक कलाकार होते.

Story img Loader