प्रियकरासाठी भारतात आलेल्या पाकिस्तानी सीमा हैदरची गेले काही दिवस जोरदार चर्चा आहे. सीमा व सचिन मीणा यांनी काम मिळत नसल्याची तक्रार केल्यानंतर त्यांना चित्रपटात काम करण्याची ऑफर मिळाली. आता या दोघांच्या प्रेम कहाणीवर चित्रपट बनणार असल्याची माहिती समोर आली आहे. ‘कराची टू नोएडा’ असं या चित्रपटाचं नाव असेल. हा चित्रपट जानी फायरफॉक्सचे मॅनेजिंग डायरेक्टर अमित जानी बनवणार आहेत. त्यांनी ८ ऑगस्टला याबाबत माहिती दिली होती. त्यानंतर आता चित्रपटासाठी ऑडिशन सुरू झाल्याचं कळतंय.

इतकंच नव्हे तर आता सीमा खुद्द अभिनयात उतरणार असल्याची चर्चा होत आहे. राजस्थानमधील उदयपूर येथील शिंपी कन्हैया लालच्या हत्येवर ‘ए टेलर मर्डर स्टोरी’ चित्रपट बनवला जात आहे. या चित्रपटात सीमा हैदर भारतीय रॉ एजंटची भूमिका साकारताना दिसणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे, गेल्याच आठवड्यात या चित्रपटासाठी सीमाने ऑडिशनदेखील दिल्याचं स्पष्ट झालं आहे.

Aakhil bharatiya chitrapat mahamandal meeting held peacefully Kolhapur news
कोल्हापूर: चित्रपट महामंडळाची बैठक खेळीमेळीत झाल्याचा दावा; बाहेर गोंधळ आत शांतता
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
kangana ranaut emergency movie ban in bangladesh
कंगना रणौत यांच्या ‘इमर्जन्सी’ चित्रपटावर बांगलादेशने घातली बंदी, ‘या’ कारणामुळे घेतला निर्णय
Siddharth Chandekar
“असं कसं तुटेल?”, सिद्धार्थ चांदेकरने सादर केली नात्यांवर आधारित कविता; म्हणाला, “आठवणींची जागा अहंकारानं…”
prasad oak baburav paintar biopic
प्रसाद ओक करणार प्रसिद्ध निर्माते आणि दिग्दर्शक बाबुराव पेंटर यांची भूमिका; पोस्ट शेअर करत म्हणाला, “ही भूमिका साकारायला मिळणं हा श्री…”
mrunal thakur marathi film sangeet manapman review
सुबोध भावेच्या ‘संगीत मानापमान’ सिनेमासाठी अभिनेत्री मृणाल ठाकूरची पोस्ट, म्हणाली…
aishwarya narkar faces trolling for wearing sleeveless blouse
स्लिव्हलेस ब्लाऊजमुळे शिव्या घातल्या, संस्कृती दाखवली…; ऐश्वर्या नारकरांनी ट्रोलर्सना विचारला जाब, ‘तो’ अनुभव सांगत म्हणाल्या…
magsaysay award sonam wangchuck
खरा ‘रँचो’ कोणता? महावीरचक्र विजेता, की मॅगसेसे विजेता? विकीपीडियाने…

आणखी वाचा : “आईने मला रामायण व महाभारत या मालिका दाखवल्या नाहीत कारण…” कोंकणा सेन शर्माचं वक्तव्य चर्चेत

या प्रकरणावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस आणि महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी भाष्य केलं आहे. असला कोणताही प्रकार महाराष्ट्रात खपवून घेतला जाणार नाही असं त्यांनी जाहीर केलं आहे. याबरोबरच पाकिस्तानी लोकांच्या चित्रपटसृष्टीत काम करण्यावरही त्यांनी भाष्य केलं आहे.

अमेय खोपकर आपल्या ट्वीट मध्ये लिहितात, “पाकिस्तानी नागरिकाला भारतीय चित्रपटसृष्टीत कोणतंही स्थान असता कामा नये, या आमच्या भूमिकेवर आम्ही ठाम आहोत. सीमा हैदर ही पाकिस्तानी महिला सध्या भारतात आहे. ती ISI एजंट आहे अशा बातम्याही पसरल्या होत्या. आमच्या इंडस्ट्रीमधील काही उपटसुंभ प्रसिद्धीसाठी त्याच सीमा हैदरला अभिनेत्री बनवतायत. देशद्रोही निर्मात्यांना लाजा कशा वाटत नाहीत? हे असले तमाशे ताबडतोब बंद करा, नाहीतर मनसेच्या धडक कारवाईसाठी तयार रहा, असा जाहीर इशारा देतोय. ऐकल नाही तर राडा तर होणारच..!!”

सीमा-सचिन आणि कन्हैयालाल यांच्यावरील दोन्ही चित्रपटांची घोषणा केल्यापासून अमित जानी यांना जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. आता या प्रकरणात मनसेनेही आक्रमक पवित्रा घेतल्याने याची जोरदार चर्चा होत आहे. अमेय खोपकर यांच्या या ट्वीटनंतर यावर काही कारवाई होणार की नाही ते येत्या काही दिवसांत समोर येईलच.

Story img Loader