बॉलिवूडमध्ये सध्या सर्वाधिक चर्चेत असलेली जोडी अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांच्यामध्ये सध्या काही आलबेल नसल्याचं वृत्त आहे. गेल्या काही दिवसांपासून रणबीर आलियापासून दूर राहण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा आहे. आता या सर्व चर्चांनंतर हे दोघे नुकतेच एका कार्यक्रमात एकत्र दिसले. ‘उमंग’ या कार्यक्रमात दोघांनी एकत्र हजेरी लावली आणि स्टेजवर एकत्र डान्ससुद्धा केला.

आलियाचे सतत फोन कॉल आणि मेसेज करणे यामुळे रणबीर त्रस्त झाल्याचं म्हटलं जात होतं. रणबीरला आलियाचं हे वागणं रुचत नसून त्याला थोडा वेळ हवा आहे. दोघांच्या नात्याबद्दल या चर्चा सुरू असतानाच ‘उमंग’ कार्यक्रमात एकत्र हजेरी लावून या दोघांनी सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे असं म्हणावं लागेल.

आलिया आणि रणबीर दोघांनीही प्रसारमाध्यमांसमोर नात्याची कबुली दिली होती. रणबीरच्या कुटुंबीयांशी आलियाची जवळीक झाली आहे. ती अनेकदा ऋषी कपूर यांना भेटण्यासाठी न्यूयॉर्कलाही गेली होती. इतकंच नव्हे तर कपूर कुटुंबीयांनीही आलियाला स्वीकारलं आहे. दरम्यान हे दोघेही आगामी ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटात पहिल्यांदाच एकत्र झळकणार आहेत. या चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर रणबीर-आलियाने विवाहबंधनात अडकावं अशी नीतू कपूर यांची इच्छा आहे.

Story img Loader