इंडिया गॉट लेटेंट या शोमध्ये आक्षेपार्ह विधान केल्याने रणवीर अलाहाबादिया(Ranveer Allahbadia)चांगलेच ट्रोल केले जात आहे. त्याबरोबरच त्याच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी, अशी मागणीही केली जात आहे. अनेकांनी त्याच्याकडून ही अपेक्षा नसल्याचे म्हटले आहे. रणवीर अलाहाबादिया हा एक प्रसिद्ध यूट्यूबर असून, त्याच्या शोला फॉलो करणाऱ्या प्रेक्षकांची संख्या जास्त आहे. आता या सगळ्यात राखी सावंत(Rakhi Sawant)ने त्याला माफ करा, असे म्हटल्याने, ती चर्चेत आली आहे.
राखी सावंत काय म्हणाली?
रणवीर अलाहाबादियाच्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर त्याने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करीत माफी मागितली होती. त्याने म्हटले होते की, ‘इंडिया गॉट लेटेंट’मध्ये मी जे वक्तव्य केले, त्याबद्दल मी माफी मागतो. जे काही झाले, त्यासाठी मी कोणतेही संदर्भ किंवा कोणतेही स्पष्टीकरण देणार नाही. मी इथे फक्त माफी मागायला आलो आहे, असे म्हणत त्याने माफी मागितली होती. रणवीरने माफी मागितल्यानंतर राखी सावंतने सोशल मीडियावर रणवीरला माफ करा, असे म्हटले.
राखी सावंतने म्हटले, “त्याला माफ करा. असे कधीतरी घडते. मला माहीत आहे की, त्याने चूक केले. पण, त्याला माफ करा”, असे म्हणत तिने चाहत्यांना, रणवीरला माफ करा, असे म्हटले आहे. समय रैनाच्या ‘इंडिया गॉट लेटेंट’मधील रणवीर अलाहाबादियाच्या वक्तव्याचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला. त्याच्यावर सर्व बाजूंनी टीका होत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्याबरोबरच रणवीरच्या माफीच्या व्हिडीओवर अनेकांनी टीका केल्याच्या कमेंट्स पाहायला मिळत आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे प्रेक्षकांकडून टीका होण्याबरोबरच, रणवीरच्या यूट्यूब चॅनेलवरील सबस्क्रायबर्सची संख्यादेखील कमी झाली आहे.
रणवीरच्या बीअर बायसेप्स या यूट्यूबचे जवळजवळ दोन दशलक्ष सबस्क्रायबर्स कमी झाले आहे. इतकेच नाही, तर राष्ट्रीय मानवाधिकार आयोगा (NHRC)ने रणवीर अलाहाबादियाला नोटीस पाठवली आहे. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने पाठविलेल्या नोटिशीमुळे रणवीरच्या अडचणींत भर पडली आहे. यूट्यूबला राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने पत्र लिहिले आहे आणि हा व्हिडीओ हटविण्याचे निर्देश दिले आहेत.
दरम्यान, रणवीर अलाहाबादिया हा प्रसिद्ध यूट्यूबरपैकी एक आहे. त्याच्या पॉडकास्टमध्ये बॉलीवूड सेलेब्रिटींपासून ते आध्यात्मिक गुरूंपर्यंत सर्व जण हजेरी लावताना दिसतात. अनेक तज्ज्ञ व्यक्तींनी त्याच्या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली आहे. अजय देवगण, अक्षय कुमार, मृणाल ठाकूर, अनन्या पांडे, रोहित शेट्टी अशा अनेक बॉलीवूडमधील कलाकारांनी त्याला मुलाखती दिल्या आहेत.