बॉलिवूडचा ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ अर्थात आमिर खानने नुकतंच झी मराठी वाहिनीवरील ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमात हजेरी लावली. आमिर याआधीही या कार्यक्रमाच्या मंचावर आला होता. पण यावेळची विशेष लक्षणीय बाब म्हणजे आमिर आणि त्याची पत्नी किरण रावला मराठमोळ्या अंदाजात पाहिलं गेलं. या दोघांनी ‘चला हवा येऊ द्या’च्या मंचावर मराठीत स्कीटसुद्धा सादर केलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

डोक्यावर टोपी, सदरा, पायजमा या अवतारात आमिर तर किरण रावने मराठमोळ्या अंदाजात पैठणी परिधान केली. नाकात नथ, डोक्यावर पदर असा किरण रावचा लूक पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी भाऊ कदमने सोशल मीडियावर आमिर आणि किरण रावसोबतचा फोटो शेअर केला होता. तेव्हापासूनच या एपिसोडची चर्चा होती. त्यानंतर आमिर जेव्हा ‘चला हवा येऊ द्या’च्या सेटवर पोहोचला, तेव्हा त्याने तिथून फेसबुक लाइव्हसुद्धा केलं होतं.

आमिरला आपण नेहमीच पडद्यावर अभिनय करताना पाहतो. पण ‘चला हवा येऊ द्या’च्या कार्यक्रमात प्रेक्षकांना आता किरण रावचंही अभिनय पाहायला मिळणार आहे. स्किटमध्ये आमिरसोबत किरणनेही अभिनय केलं आहे. या एपिसोडची प्रेक्षकांमध्ये फार उत्सुकता आहे.