बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान सध्या त्याच्या ‘लाल सिंह चड्ढा’ या सिनेमामुळे चांगलाच चर्चेत आला आहे. आमिर या सिनेमाचं जोरदार प्रमोशन करत आहे. नुकतीच आमिर आणि करीनाने ‘कॉफी विथ करण’ या शोमध्ये हजेरी लावली होती. या शोमध्ये आमिरने बॉलिवूड, करियरसह अनेक खासगी मुद्द्यांवर मनमोकळ्या गप्पा मारल्या. शोमध्ये गप्पा रंगलेल्या असतानाच आमिरने साउथचे लोकप्रिय दिग्दर्शक एसएस राजमौलींसोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली.

‘कॉफी विथ करण’ या शोमध्ये करणने आमिरला कोणत्या दिग्दर्शकासोबत काम करण्याची इच्छा आहे असा प्रश्न विचारला होता? यावर आमिरने त्याला अनेक दिग्दर्शकांसोबत काम करण्याची इच्छा असल्याचं सांगितलं. मात्र या यादीत एसएस राजमौली पहिल्या क्रमांकावर असल्याचं तो म्हणाला. काही दिवसांपूर्वी आमिरला एसएस राजमौली यांच्यासोबत स्पॉट करण्यात आलं होतं. आमिर खानने हैद्राबादमध्ये साऊथ सेलिब्रिटींसाठी ‘लाल सिंह चड्ढा’ सिनेमाचं स्क्रीनिंग ठेवलं होतं. या स्क्रीनिंगला राजमौली यांनी हजेरी लावली होती. ‘लाल सिंह चड्ढा’च्या ट्रेलर लॉन्चनंतर एसएस राजमौली यांनी सिनेमाची प्रशंसादेखील केली होती.

हे देखील वाचा: “तू लेखक नाहीस” म्हणत आमिर खानने दिला होता अतुल कुलकर्णीच्या ‘लाल सिंग चड्ढा’ला नकार

हैद्राबादमध्ये देखील सिनेमाच्या प्रमोशनवेळी आमिरने राजमौली यांचं नाव घेतलं होतं. त्यामुळे आमिरही लवकरच एखाद्या तेलगू दिग्दर्शकासह बिग बजेट सिनेमामध्ये झळकण्याची शक्यता नाकारता येत नाही.

हे देखील वाचा: “…तेव्हा माझे हात, पाय थरथरतात” अमिताभ बच्चन यांनी सांगितला ‘कौन बनेगा करोडपती’ सेटवरचा अनुभव

दरम्यान, आमिर खानचा ‘लाल सिंह चड्ढा’ हा सिनेमा ११ ऑगस्टला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. हा सिनेमा हिंदीसह तामिळ, तेलगू, मल्याळी आणि हिंदी भाषेत रिलीज होणार आहे. तसंच हा सिनेमा १९९४ सालातील ऑस्कर विजेता हॉलिवूडपट ‘फॉरेस्ट गंप’ चा हिंदी रिमेक आहे.