बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान त्याच्या प्रत्येक भूमिकेसाठी कायम मोठी मेहनत घेताना दिसतो. वजन वाढवणं असो किंवा कमी करणं, वेगवेगळे लूक यावर आमिर नेहमी मेहनत घेतो. सध्या आमिर खानचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ ‘धूम ३’ या सिनेमाच्या वेळीचा आहे. या व्हिडीओत आमिर खान जीममध्ये वर्कआऊट करताना दिसतोय.
या व्हिडीओत आमिर खान डंबेल घेऊन वर्क आऊट करताना दिसतोय. आमिरचा हा व्हिडीओ पाहून त्याच्या लेकीने म्हणजेच आयरा खाने एक प्रश्न विचारत आश्चर्य व्यक्त केलंय. पॉझनिक ट्रेनिंग या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आमिर खानच्या या वर्कआऊटचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.
View this post on Instagram
आमिर खानच्या या व्हिडीओचा एक स्क्रीनशॉट आयराने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये ती म्हणालीय, “”हा कोणता व्यायाम आहे?”

दरम्यान हा व्हिडिओ शेअर करत सेलिब्रिटी ट्रेनरने या व्यायामाचं महत्व पटवून सांगितलं आहे. तसचं ‘धूम ३’ या सिनेमातील आमिरच्या भूमिकेसाठी आणि त्याने केलेल्या स्टंटसाठी हा व्यायाम उपयोगी ठरल्याचं तो म्हणालाय.
‘धूम’ सिनेमाप्रमाणेच आमिर खानने यापूर्वी त्याच्या दंगल सिनेमासाठी मोठी मेहनत घेतली होती. या सिनेमासाठी आमिरने तरुण दिसण्यासाठी २० किलो वजन कमी केलं होतं. लवकरच आमिर ‘लाल सिंह चड्ढा’ या सिनेमात झळकणार असून सध्या लडाखमध्ये या सिनेमाचं शूटिंग सुरुय.