बॉलिवूडमध्ये दर्जेदार विषय, भारतीय संस्कृती, मूल्य आपल्या चित्रपटातून दाखवणारी ‘राजश्री प्रॉडक्शन’ ही संस्था गेली अनेकवर्ष कार्यरत आहे. ‘चित्तचो’र, ‘दोस्त’, ‘नादिया के पार’, ‘हम आपके हैं कौनसारखे भारतीय प्रेक्षकांच्या पसंतीचे हे चित्रपट राजश्री प्रॉडक्शन या संस्थेने निर्माण केले आहेत. सचिन पिळगावकर, सलमान खान, लक्ष्मीकांत बेर्डे यांसारख्या दिग्गज कलाकरांना या संस्थेने संधी दिली आहे. हीच संस्था आता एक नवा चित्रपट घेऊन येत आहे. या चित्रपटाचं नाव आहे ‘उंचाई’. राजश्रीने आपल्या बहुचर्चित, मल्टीस्टारर चित्रपट ‘उंचाई’चा पहिला लूक काही दिवसांपूर्वी प्रदर्शित केला होता.

चित्रपटाच्या पहिल्या लुकला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहून राजश्रीने आता ‘उंचाई’चे दुसरे पोस्टर प्रदर्शित केले आहे. ‘उंचाई’ हा २०२२ मधील सगळ्यात मोठा चित्रपट म्हणून ओळखला जात आहे. या चित्रपटात तब्बल आठ दिग्गज कलाकार एकत्र काम करताना दिसणार आहेत. अमिताभ बच्चन, अनुपम खेर, बोमन इराणी, नीना गुप्ता, सारिका आणि परिणीती चोप्रा यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटात डॅनी डेन्ग्झोंपा आणि नफीसा अली सोधी यांच्याही अत्यंत महत्त्वपूर्ण अशा भूमिका आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन सुरज बडजात्या यांनी केले आहे. ‘मैने प्यार किया’, ‘हम आपके है कौन’, ‘हम साथ साथ हैं’ सारख्या सुपरहिट चित्रपटाचं त्यांनी दिग्दर्शन केलं होत.

nana patekar amitabh bachchan KBC 16
नातवाच्या जन्मानंतर अमिताभ बच्चन मिठाई घेऊन आले अन्…, नाना पाटेकरांनी सांगितला किस्सा; ‘ती’ भेटवस्तू अजूनही ठेवलीये जपून
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Amitabh Bachchan talks about intercultural marriages in his family
“भावाचं लग्न सिंधी मुलीशी, मुलगी पंजाबी कुटुंबात अन् मुलगा…”; अमिताभ बच्चन यांचे कुटुंबातील सदस्यांच्या लग्नाबाबत वक्तव्य
Sudhir Mungantiwar On Karnataka
Sudhir Mungantiwar : “कर्नाटक सरकारला याचा हिशेब द्यावा लागेल”; सुधीर मुनगंटीवार यांचा इशारा, कारण काय?
Rahul Gandhi Narendra Modi Gautam Adani (2)
VIDEO : संसदेच्या आवारात राहुल गांधींनी घेतली ‘मोदी-अदाणीं’ची मुलाखत? विरोधी खासदारांनीच घातले मुखवटे
Amitabh Bachchan angry post
“मूर्ख आणि बिनडोक…”, अमिताभ बच्चन कोणावर भडकले? म्हणाले, “विवेकहीन आणि अर्धवट बुद्धी…”
Amiatbh Bachchan And Rekha
रेखा यांनी सांगितला अमिताभ बच्चन यांच्याबरोबर ‘सुहाग’ या चित्रपटात काम करण्याचा अनुभव, म्हणाल्या, “ज्यांच्याबरोबर मी…”
Aishwarya Rai Abhishek Bachchan
“ऐश्वर्या-अभिषेक बच्चनचा स्वभाव एकमेकांच्या अगदी विरुद्ध…”, ‘कुछ ना कहो’फेम अभिनेत्रीचा खुलासा

अभिनेत्री स्वरा भास्करच्या ‘या’ चित्रपटाला प्रेक्षकांची नापसंती, IMDB ने दिले इतके रेटिंग

. उंचाई’च्या या नव्या पोस्टरमध्ये अमिताभ बच्चन, अनुपम खेर आणि बोमन इराणी हिमालयातील एका दगडावर ट्रेकमधून विश्रांती घेत बसलेले दिसत आहेत. या चित्रपटाची टॅगलाइन – ‘मैत्री ही त्यांची एकमेव प्रेरणा होती’ अशी आहे. या चित्रपटातून पहिल्यांदा तीन दिग्गज कलाकारांचा अभिनय बघायला मिळणार आहे. अनुपम खेर यांनी राजश्री संस्थेबरोबर याआधीदेखील काम केले आहे.

कमलकुमार बडजात्या, स्वर्गीय राजकुमार बडजात्या आणि राजश्रीचे अजित कुमार बडजात्या द्वारा निर्मित ‘उंचाई’ ही राजश्रीची ६० वी चित्रपट निर्मिती आहे. राजश्री प्रॉडक्शनने महावीर जैन फिल्म्सचे महावीर जैन आणि बाउंडलेस मीडियाच्या नताशा मालपाणी ओसवाल यांना यांच्याबरोबरीने चित्रपटाची निर्मिती केलेली आहे. हा चित्रपट प्रेक्षकांचे नक्कीच मनोरंजन करील यात शंका नाही. हा चित्रपट ११.११.२२ ला संपूर्ण देशभर प्रदर्शित होणार आहे.

Story img Loader