बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन यांची प्रमुख भूमिका असलेला ‘झुंड’ हा चित्रपट चांगलाचा गाजला. नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘झुंड’ या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता प्रियांशू क्षत्रिय याला चोरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. १८ वर्षीय प्रियांशू क्षत्रियला नागपूर शहर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. प्रियांशूने ‘झुंड’ चित्रपटात बाबू ही भूमिका साकारली होती.
एका पोलिस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी नागपूरमधील मनकापूर भागातील रहिवासी असलेल्या ६४ वर्षीय प्रदीप मोंडावे यांच्या घरातून पाच लाख रुपये किमतीचे दागिने आणि रोख रक्कम चोरीला गेले होते. याप्रकरणी मोंडावे यांनी पोलिसात तक्रार दाखल केली होती. मोंडावे कुटुंबाच्या नागपुरातील राहत्या घरातून हा ऐवज चोरी झाला होता. त्यानंतर नागपूर पोलिसांनी एका अल्पवयीन संशयिताला ताब्यात घेतले होते. त्याची चौकशी केल्यानंतर या गुन्ह्यात प्रियांशू क्षत्रियचा सहभाग असल्याचा दावा त्याने केला.
आणखी वाचा : “पुण्यात नेऊन माझी किडनी काढून घेतली तर…?” ‘झुंड’मधील बाबूने सांगितला ‘तो’ भन्नाट किस्सा
यानंतर नागपूर शहर पोलिसांनी मंगळवारी १८ वर्षीय प्रियांशू क्षत्रियला अटक केली. प्रियांशू क्षत्रियला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला २५ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तसेच नागपुरातील गड्डीगोदाम परिसरात एका कबुतराच्या पेटीतून चोरीच्या वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे. प्रियांशू क्षत्रिय याला यापूर्वी रेल्वे प्रवाशांचे मोबाईल चोरल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती.
आणखी वाचा : “ट्रेनमधून कोळसा पाडत होतो अन् त्याचवेळी…”; ‘झुंड’मधील कलाकाराने सांगितला ‘तो’ किस्सा
दरम्यान नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘झुंड’ या बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपटाने चांगली कमाई केली होती. बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन यांनी या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली होती.‘झुंड’ या चित्रपटाची अनेक चित्रपट समीक्षक तसेच कलाकार कौतुक करताना दिसत होते. या चित्रपटात प्रियांशू क्षत्रियने बाबू नावाचे पात्र साकारले होते. “अरे क्या फुर्र फुर्र कर रहा है? इधर क्या खजाना वजाना गाडा है क्या?”, हा त्याचा डायलॉग फारच लोकप्रिय ठरला होता.