बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन हे लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहेत. काल अमिताभ यांनी ७९ वा वाढदिवस साजरा केला. या निमित्ताने अमिताभ यांना त्यांच्या चाहत्यांपासून सेलिब्रिटींनी शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी त्यांचा मुलगा आणि अभिनेता अभिषेक बच्चनने त्यांना शुभेच्छा दिल्या. तर, त्यांची लाडकी नात आराध्याने देखील त्यांना शुभेच्छा दिल्या आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ऐश्वर्याने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून आराध्या आणि अमिताभ यांचा हा फोटो शेअर केला आहे. या फोटोत अमिताभ यांनी पांधऱ्या रंगाचा कम्फर्टेबल गाऊन परिधान केला आहे. तर आराध्याने गुलाबी रंगाचा टॉप परिधान केला आहे. हा फोटो शेअर करत ऐश्वर्याने आराध्याकडून अमिताभ यांना शुभेच्छा दिल्या आहेत. “वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आजोबा. खूप खूप प्रेम,” अशा आशयाचे कॅप्शन ऐश्वर्याने दिले आहे. हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

आणखी वाचा : रकुल प्रीत सिंगने ‘या’ बॉलिवूड अभिनेत्यासोबत फोटो शेअर करत दिली प्रेमाची कबुली

आणखी वाचा : अमिताभनं आता तरी निवृत्ती घ्यावी, सलीम खानांचा प्रेमळ सल्ला

दरम्यान, अमिताभ यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या एक दिवस आधी एक फोटो शेअर केला होता. हा फोटो शेअर करत ते वयाच्या ८० व्या वर्षात पदार्पण करत असल्याचे म्हटले आहे. त्यांनी चुकून एक वर्ष जास्त सांगितल्याने त्यांची लेक श्वेता बच्चन नंदाने कमेंट करत त्यांना ७९ वयाचे झालात अशी आठवण करून दिली.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amitabh bachchan aaradhya wishes her grandfather aishwarya shared a photo dcp