चित्रपटसृष्टीचे थलाईवा रजनीकांत लवकरच ‘जय भीम’ चित्रपटाचे दिग्दर्शक टीजे ज्ञानवेल यांच्या चित्रपटात झळकणार आहेत. या चित्रपटात महानायक अमिताभ बच्चन देखील दिसणार असल्याची चर्चा होत आहे. तब्बल ३२ वर्षांनी हे दोन मेगास्टार एकत्र दिसणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. रजनीकांत यांच्या या आगामी चित्रपटात एका खास भूमिकेसाठी अमिताभ बच्चन यांना विचारण्यात आल्याचं स्पष्ट झालं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘ई-टाईम्स’च्या वृत्तानुसार, या नवीन चित्रपटाची माहिती रजनीकांतच्या जवळच्या सूत्राने दिली आहे. या चित्रपटासाठी अमिताभ बच्चन यांच्याशी बोलणी सुरू असल्याचे त्यांचे म्हणणे असून लवकरच दिग्दर्शक या चित्रपटाची घोषणा करणार आहेत.

आणखी वाचा : शाहरुख खानच्या चाहत्यांनी ‘मन्नत’बाहेर येऊन रचला इतिहास; केलं असं काही की किंग खानही भारावला

टीजे ज्ञानवेल यांचा हा चित्रपट एका सत्य घटनेवर आधारित आहे, ज्यामध्ये रजनीकांत मुस्लिम पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारणार आहेत. अमिताभ आणि रजनीकांत यांनी ‘हम तुम’, ‘गिरफ्तार’ आणि ‘अंधा कानून’सारख्या गाजलेल्या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. अद्याप या नव्या प्रोजेक्टबद्दल अधिकृत घोषणा झालेली नसली तरी अमिताभ यांच्याशी प्राथमिक बोलणी सुरू असल्याची माहिती मीडिया रीपोर्टमधून समोर आली आहे.

रजनीकांत सध्या ‘जेलर’ आणि ‘लाल सलाम’च्या चित्रीकरणामध्ये व्यस्त आहेत. हे दोन्ही चित्रपट पूर्ण केल्यानंतर ते टीजे ज्ञानवेलच्या चित्रपटासाठी काम सुरू करणार आहेत. रजनीकांत यांचा हा १७० वा चित्रपट असल्याने त्याचे नाव सध्या ‘थलायवा १७०’ असे ठेवण्यात आले आहे. तर अमिताभ बच्चन सध्या ‘सेक्शन ८४’चे शूटिंग करत आहेत. रिभू दासगुप्ता याचे दिग्दर्शन करत आहेत.