बॉलीवूड मेगास्टार अमिताभ बच्चन यांनी ब्लॉगवर आपल्या प्रकृतीबाबत संभ्रमात टाकणाऱया टीप्पणीबाबत स्पष्टीकरण दिले आहे. ब्लॉगवर व्यक्त केलेल्या मताचा आपल्या प्रकृतीशी काहीही संबंध नसून आपण अगदी ठणठणीत असल्याचा निर्वाळा अमिताभ यांनी मंगळवारी srbachchan.tumblr.com. या आपल्या ब्लॉगवरून दिला.
‘बिग बी’ अमिताभ बच्चन सोशल मीडियावर चांगले सक्रीय आहेत. ट्विटर, फेसबुक, ब्लॉग या माध्यमांतून अमिताभ वेळोवेळी व्यक्त होत असतात. अमिताभ यांचे लाखोंच्या घरात फॉलोअर्स आहेत. दरम्यान, आपल्या ब्लॉगमध्ये एका संभ्रमात टाकणाऱया विधानामुळे चाहत्यांच्या मनात अमिताभ यांच्या प्रकृतीबाबत चाहत्यांमध्ये काळजी निर्माण होऊ लागली होती. तसेच आपल्या महानायकाच्या प्रकृतीची विचारपूस करणाऱया प्रश्नांची मालिकाच सोशल मीडियावर सुरू झाली होती. याची दखल घेत अमिताभ यांनी आपल्या प्रकृती स्वास्थ्याची माहिती देत अगदी ठणठणीत असल्याचे सांगितले.
प्रकृती उत्तम असल्याचे अमिताभ यांचे स्पष्टीकरण
ब्लॉगवर व्यक्त केलेल्या मताचा आपल्या प्रकृतीशी काहीही संबंध नसून आपण अगदी ठणठणीत असल्याचा निर्वाळा अमिताभ यांनी मंगळवारी srbachchan.tumblr.com. या ब्लॉगवरून दिला.
First published on: 26-05-2015 at 03:26 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amitabh bachchan clarifies he is fit and fine