बॉलीवूड मेगास्टार अमिताभ बच्चन यांनी ब्लॉगवर आपल्या प्रकृतीबाबत संभ्रमात टाकणाऱया टीप्पणीबाबत स्पष्टीकरण दिले आहे. ब्लॉगवर व्यक्त केलेल्या मताचा आपल्या प्रकृतीशी काहीही संबंध नसून आपण अगदी ठणठणीत असल्याचा निर्वाळा अमिताभ यांनी मंगळवारी srbachchan.tumblr.com. या आपल्या ब्लॉगवरून दिला.
‘बिग बी’ अमिताभ बच्चन सोशल मीडियावर चांगले सक्रीय आहेत. ट्विटर, फेसबुक, ब्लॉग या माध्यमांतून अमिताभ वेळोवेळी व्यक्त होत असतात. अमिताभ यांचे लाखोंच्या घरात फॉलोअर्स आहेत. दरम्यान, आपल्या ब्लॉगमध्ये एका संभ्रमात टाकणाऱया विधानामुळे चाहत्यांच्या मनात अमिताभ यांच्या प्रकृतीबाबत चाहत्यांमध्ये काळजी निर्माण होऊ लागली होती. तसेच आपल्या महानायकाच्या प्रकृतीची विचारपूस करणाऱया प्रश्नांची मालिकाच सोशल मीडियावर सुरू झाली होती. याची दखल घेत अमिताभ यांनी आपल्या प्रकृती स्वास्थ्याची माहिती देत अगदी ठणठणीत असल्याचे सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा