बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन हे लवकरच एका मराठी चित्रपटात झळकणार असल्याचे कळताच चाहत्यांमध्ये चित्रपटाची उत्सुकता वाढली होती. या चित्रपटाचे नाव ‘एबी आणि सीडी’ आहे. तसेच या चित्रपटात अमिताभ यांच्यासोबत विक्रम गोखले दिसणार आहे. नुकतच या चित्रपटाचे पोस्टर देखील प्रदर्शित झाले. तसेच या चित्रपटासाठी बिग बींनी एका वेगळा निर्णय घेतल्याचा खुलासा चित्रपट निर्मात्यांनी केला.
मराठी चित्रपटांचे बजेट कमी असल्यामुळे बिग बींनी चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी स्वत:च्या वार्डरोबमधील कपडे वापरले आहेत. चित्रपटाचे निर्माते अक्षय बर्दापूरकर यांनी हा खुलासा केला आहे. ‘जेव्हा मी बिग बींना त्यांच्या कपड्यांचे माप घेण्यासाठी डिझायनरला कधी पाठवायचे असे विचारले तेव्हा ते म्हणाले की तू काळजी करु नकोस. मी चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी स्वत:चे कपडे वापरेन. चित्रीकरणाच्या दिवशी बिग बी त्यांचे २० जोडी कपडे व्हॅनिटी व्हॅनमध्ये घेऊन आले होते. त्यांनी चित्रपटाच्या टीमला योग्य कपड्यांची निवड करण्यास सांगितले’ असे अक्षय यांनी म्हटले.
T 3437 – ‘एबी आणि सीडी’चा याराना,
बघेल आता जमाना…!!!
‘एबी आणि सीडी’चा याराना,
बघेल आता जमाना…!!! 13th March 2020 release!
Directed by @lelemilind
Produced by @akshayent
, @PlanetMarathi
and @GRfilmssg— Amitabh Bachchan (@SrBachchan) February 10, 2020
पाहा : अभिनेता जॉन अब्राहमचे घर आतुन कसे दिसते
बिग बींनी १९९४ साली ‘आक्का’ या मराठी चित्रपटात काम केले होते. या चित्रपटात त्यांच्यासोबत जया बच्चनदेखील झळकल्या होता. आता तब्बल २६ वर्षांनंतर बिग बी पुन्हा एकदा मराठी चित्रपटात झळकणार आहेत. मिलिंद लेले दिग्दर्शित ‘ए बी आणि सी डी’ या चित्रपटात ते महत्त्वाची भूमिका साकारत आहेत. या चित्रपटात सुबोध भावे, सायली संजीव, अक्षय टंकसाळे, शर्वरी लोहोकरे, नीना कुळकर्णी, लोकेश गुप्ते, सीमा देशमुख, सागर तळाशीकर यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. त्यामुळे या कलाकारांची ऑनस्क्रीन मैत्री येत्या १३ मार्चला पाहायला मिळणार आहे.