भारतीय चित्रपटाला १०० वर्षे पूर्ण होण्याच्या अवचित्यानिमित्त बिटेनमध्ये करण्यात आलेल्या सर्वेश्रणानुसार बॉलीवूड शेहनशाह अमिताभ बच्चन हे सर्वोत्कृष्ट अभिनेता ठरले आहेत. ब्रिटनमधील ‘इस्टर्न आय’ या साप्ताहिक दैनिकाने केलेल्या सर्वेक्षणानुसार अमिताभ बच्चने हे सर्वोत्कृष्ट अभिनेता ठरले असून दिलीप कुमार हे दुस-या तर बादशाह शाहरुख खान तिस-या स्थानावर आहे. प्रेक्षकांची मते, बॉक्स ऑफिस आकडेवारी, चित्रपटांचा प्रभाव आणि चित्रपट समीक्षकांची मते यांच्याआधारे हे सर्वेक्षण करण्यात आले होते.
अमिताभ बच्चन यांनी ४० वर्षाच्या कारकिर्दित ‘शोले’, ‘दिवार’सारखे यशस्वी चित्रपट केले आहेत. दरम्यान, चित्रपटसृष्टीपासून काही वर्षांसाठी दुरावल्यानंतार त्यांनी ‘कौन बनेगा करोडपती’ या लोकप्रिय गेम शोचे सूत्रसंचालन केले. आता या गेम शोच्या सातव्या पर्वाचे सूत्रसंचालनही बिगबी हेच करणार आहेत. मादाम तुसॉं संग्रहालयात पुतळा बसविण्यात आलेले ते पहिले बॉलिवूड अभिनेता आहेत. २०१२ साली झालेल्या ऑल्मिपिक स्पर्धेत अमिताभ यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले. चित्रपटसृष्टीतील कारकिर्द, प्रभाव, चाहत्यांची संख्या, भूमिकांमधील विविधता पाहता जागतिक चित्रपटाच्या इतिहासात अमिताभ हे महान अभिनेता आहेत, असे ‘शोबिझ’ मासिकाचे संपादक अस्जद नाझिर म्हणाले.
बॉलीवूड अभिनेत्रींमध्ये माधुरी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ठरली असून या सर्वोत्कृष्ट कलाकारांच्या यादीत तिने चौथे स्थान पटकावले आहे.
ब्रिटनमधील सर्वेक्षणानुसार अमिताभ बच्चन सर्वोत्कृष्ट अभिनेता
भारतीय चित्रपटाला १०० वर्षे पूर्ण होण्याच्या अवचित्यानिमित्त बिटेनमध्ये करण्यात आलेल्या सर्वेश्रणानुसार बॉलीवूड शेहनशाह अमिताभ बच्चन हे सर्वोत्कृष्ट अभिनेता ठरले आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 27-07-2013 at 03:25 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amitabh bachchan crowned greatest bollywood star in uk poll