बॉलिवूडचे शेहनशहा अर्थात बिग बी अमिताभ बच्चन यांचा आज ७९वा वाढदिवस आहे. जवळपास ५ दशकांहून अधिक काळ अमिताभ बच्चन यांनी बॉलिवूडमध्ये सिनेमांमध्ये विविध भूमिका साकारत प्रेक्षकांचं मनोरंजन केलंय. आज ८०व्या वर्षात पदार्पण करत असतानाही बिग बी अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या कामात खंड पडू दिलेला नाही. या वयातही ते एखाद्या तरुणाला लाजवतील या उत्साहाने आणि मेहनतीने काम करत आहेत. आणि यामुळेच ते बॉलिवूडचे महानायक आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बिग बी अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या करियरमध्ये विविध सिनेमांमधून अनेक भूमिका साकारल्या आहेत. यातील काही भूमिकांना तर प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं. तुम्हाला माहित आहे का अमिताभ बच्चन यांनी एक दोन नव्हे तर जवळपास १२ सिनेमांमध्ये डबल रोल साकारले आहेत. त्यांनी डबल रोल साकारलेल्या काही सिनेमांपैकी अनेक सिनेमे चांगलेच सुपरहिट ठरले आहेत.

सत्ते पे सत्ता

यातील बहुतांश सिनेमे त्यांनी ८०च्या दशकात केले आहेत. यातील लोकप्रिय ठरलेला सिनेमा म्हणजे ‘सत्ते पे सत्ता’. १९८२ साली रिलीज झालेल्या या सिनेमात अनेक कलाकार होते. मात्र बिग बींनी साकारलेल्या डबल रोलमुळे या सिनेमामध्ये अधिक रंगत आणली.

डॉन

तर बिग बी यांचा प्रेक्षकांमध्ये ऑल टाईम फेव्हरेट असलेला सिनेमा म्हणजेच ‘डॉन’. या सिनेमामध्ये अमिताभ बच्चन यांनी साकारलेल्या डबल रोलच्या भूमिका चांगल्याच गाजल्या होत्या. बिग बींच्या करियरमधील महत्वाच्या सिनेमांपैकी एक म्हणजे ‘डॉन’

‘महान’

तर १९८३ सालामध्ये आलेला अमिताभ बच्चन य़ांचा ‘महान’ सिनेमा चांगलाच चर्चेत आला होता. या सिनेमात बिग बींनी डबल नव्हे तर ट्रीपल रोल साकारला होता. या सिनेमात ते तीन वेगवेगळ्या लूकमध्ये झळकले होते.

सुर्यवंशम

अमिताभ बच्चन यांचा कायम चर्चेत राहिलेला सिनेमा म्हणजे सुर्यवंशम. या सिनेमात त्यांनी दोन दमदार भूमिका साकारल्या आहेत. १९९९ सालामध्ये आलेल्या या सिनेमाला मोठ्य़ा पडद्यावर फारसं यश मिळालं नसलं मात्र त्यानंतर टेलिव्हिजनवर प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणात हा सिनेमा पाहिला.

आखरी रास्ता

तसचं १९८६ साली प्रदर्शित झालेल्या ‘आखरी रास्ता’ या सिनेमामध्ये अमिताभ बच्चन डबल रोलमध्ये झळकले होते. या सिनेमात त्यांच्यासोबत श्रीदेवी आणि जया प्रदा मुख्य भूमिकेत होत्या.

देश प्रेम

१९८२ सालामध्ये हा सिनेमा रिलीज झाला होता. या सिनेमात अमिताभ बच्चन यांनी एका स्वातंत्र्य सेनानीची भूमिका साकारली होती. या काळामध्ये बिग बींनी अनेक अॅक्शन सिनेमा करण्यास सुरुवात केली होती.

तूफान

१९८९ सालामध्ये हा सिनेमा रिलीज झाला होता. यात अमिताभ यांची जबरदस्त अॅक्शन पाहायला मिळाली होती. तर ते या सिनेमात दोन वेगवेगळ्या भूमिकांमध्ये झळकले होते. बॉस्क ऑफिसवर मात्र सिनेमा फारसा चालला नाही.

खुदा गवाह

१९९२ सालामध्ये आलेला हा सिनेमा चांगलाच सुपरहिट ठरला होता. या सिनेमात अमिताभ यांचा डबल रोल होता. या सिनेमाच्या काही भागाचं शूटिंग अफगाणिस्तानमध्ये करण्यात आलं होतं. या सिनेमाला तीन फिल्म फेअर पुरस्कार मिळाले होते. या सिनेमात साउथ सुपरस्टाकर नागार्जुन देखील मुख्य भूमिकेत झळकले होते.

याशिवाय बिग बींनी १९९१ सालामध्ये आलेल्या ‘हम’ तसचं, ‘लाल बादशहा’, ‘बडे मिया छोटे मिया’, ‘कसमें वादे’, ‘द ग्रेट गैम्बलर’, या सिनेमांमध्ये डबल रोल साकारले आहेत.