बॉलीवूड शहेनशहा अमिताभ बच्चन सध्या कोलकातामध्ये आपल्या आगामी पिकू चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहेत. चित्रीकरणादरम्यान अमिताभ यांनी कोलकातामध्ये ‘खाऊगल्लीत’ जाऊन ‘स्ट्रिटफूड’ची चव चाखली. कोलकाताच्या रस्त्यावरील एका छोटेखानी ठेल्यावर कचोरी, जिलेबी खाण्याचा आनंद अमिताभ यांना चित्रीकरणाच्या पार्श्वभूमीवर लुटता आला. दरम्यान, अमिताभ यांना पाहण्यासाठी परिसरात मोठी गर्दी झाली होती.
bigb-kolkata-food-embed
‘पिकू’ चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या निमित्ताने कोलकाताच्या रस्त्यावर मनमुरादपणे सायकल आणि खाउगल्लीत कचोरी, जिलेबी खाण्याचा अनुभव घेता आल्या आनंद असल्याचे ट्विट देखील अमिताभ यांनी केले आहे.   
‘पिकू’ चित्रपटात अमिताभ यांच्यासोबत बॉलीवूड अभिनेत्री दिपीका पदुकोण, अभिनेता इरफान खान यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.

Story img Loader