बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन हे लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. ते चित्रपटांसह सोशल मीडियावरही कायमच चर्चेत असतात. पण नुकतंच बिग बी हे त्यांच्या एका ट्विटमुळे चर्चेत आलं आहेत. “हृदयाचे ठोके वाढले आहेत…” अशा आशयाचे एक ट्विट बिग बी यांनी केले होते. त्यांच्या या ट्विटनंतर अनेक चाहते काळजीत पडले होते. त्यानतंर आता अमिताभ बच्चन यांनी या ट्विटबद्दल स्पष्टीकरण दिले आहे.
अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या या ट्विटनंतर एका ब्लॉग पोस्ट लिहिली आहे. यात त्यांनी या ट्विटबद्दलचे स्पष्टीकरण दिले आहे. बिग बी म्हणाले, “मी दिवसभर कामात व्यस्त होतो आणि शूटिंगमुळे तणावाखालीही होतो. आगामी फुटबॉल सामन्यात माझा आवडता संघ चेल्सी खेळणार आहे, त्यामुळे मी तणावाखाली आहे. यावेळी ते म्हणाले की, मी माझ्या आगामी चित्रपटाचे शूटींग मड आयलंडमध्ये करत आहे.” त्यांची ही पोस्ट वाचून चाहत्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.
बिग बी यांचे ते ट्विट काय?
अमिताभ बच्चन यांनी रविवारी एक ट्वीट केले होते. त्यात त्यांनी म्हटले होते की, “हृदयाचे ठोके वाढले आहेत.. चिंता वाटत आहे.. पण मला आशा आहे की सर्व काही ठीक असेल.” त्यासोबतच बिग बींनी हृदयाचा आणि हात जोडलेला एक इमोजीही शेअर केला होता. त्यानंतर बिग बींचे हे ट्वीट चांगलेच चर्चेत आले होते. अमिताभ यांच्या या ट्वीटनंतर ते आजारी पडले आहेत, असा अंदाज चाहत्यांकडून वर्तवला जात होता. मात्र नुकतंच त्यांनी यावर स्पष्टीकरण दिले आहे.
“हृदयाचे ठोके वाढले आहेत…”, बिग बी अमिताभ बच्चन यांच्या ट्वीटमुळे चाहते चिंतेत
बिग बी हे काही दिवसांपूर्वी ‘चेहरे’ या चित्रपटात झळकले होते. त्यासोबतच बिग बींची प्रमुख भूमिका असलेला ‘झुंड’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाशिवाय ते लवकरच ‘ब्रह्मास्त्र’, ‘द इंटर्न’, ‘रनवे 34’ आणि ‘गुडबाय’ या चित्रपटांमध्ये दिसणार आहेत.