राम गोपाल वर्मा दिग्दर्शित १९९८साली प्रदर्शित झालेल्या ‘सत्या’ चित्रपटाचा सिक्वल ‘सत्या २’ लवकरच प्रदर्शित होणार आहे. वर्माच्या या चित्रपटासाठी बॉलीवूड मेगास्टार अमिताभ बच्चन यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
पहा सत्या-२ चित्रपटाचा ट्रेलर
अमिताभ यांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये ‘सत्या २’ हा सर्वात प्रभावी चित्रपट असल्याचे म्हटले आहे. त्यांनी लिहले, संध्याकाळी राम गोपाल वर्माच्या पार्टीला धावती भेट देऊन आलो. ‘सत्या २’ चित्रपटाचा परिचय करुन देण्यासाठी मी तेथे उपस्थित असावे, अशी त्याची इच्छा होती. चित्रपटाच्या कथेत नवे विचार आहेत. तसेच, यात नव्या तरुण पिढीनेही चांगले काम केले आहे. संपूर्ण पार्टीतला अजून एक क्षण म्हणजे राम गोपाल वर्माने त्याचे चित्रपटसृष्टीत येण्यामागचे श्रेय मला दिले.
‘सरकार’, ‘सरकार राज’ आणि ‘आरजीव्ही की आग’ या चित्रपटांमध्ये अमिताभ यांनी राम गोपाल वर्मासोबत काम केले आहे. ‘सत्या २’ हा अंडरवर्ल्ड जगतावर आधारित आहे. मात्र, या चित्रपटाचा ‘सत्या’शी काहीही संबंध असल्याचे वर्माने नाकारले.
संग्रहित लेख, दिनांक 21st Oct 2013 रोजी प्रकाशित
‘सत्या २’ला अमिताभ यांच्या शुभेच्छा
राम गोपाल वर्मा दिग्दर्शित १९९८साली प्रदर्शित झालेल्या 'सत्या' चित्रपटाचा सिक्वल 'सत्या २' लवकरच प्रदर्शित होणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 21-10-2013 at 01:09 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amitabh bachchan gives a thumbs up to ram gopal varmas satya