बॉलीवूडची एकेकाळची चर्चित जोडी अमिताभ आणि रेखा यांना पुन्हा एकत्र पाहण्याकरिता त्यांचे चाहते उत्सुक आहेत. पण, १९८१ साली प्रदर्शित झालेल्या सिलसिला चित्रपटाला ३० वर्षे उलटूनही ही जोडी काही एकत्र काम करायला तयार नाही. रेखा यांनी फिरोज नादीयदवालाच्या वेलकम बॅक चित्रपटात काम करण्यास नकार दिल्यानंतर आता बिग बींनीही त्याचे मौन सोडले आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आदित्य चोप्रा या जोडीला पुन्हा एकदा एकत्र आणणार असल्याचे म्हणाला होता. मात्र, अमिताभ यांनी यास नकार दिला आहे. आपण याबाबत वाचले असून, हे सत्य नाही असे ते म्हणाले. पण, यशराज बॅनरमध्ये कोणाची ओळख असल्यास त्यांनी माझे नाव सुचवावे. सध्याच्या दिवसांमध्ये काम मिळणे खूप कठीण झाले आहे, असे मिश्किलपणे अमिताभ म्हणाले.
वेलकम बॅकमध्ये रेखा-अमिताभ यांना घेण्याची निर्माता फिरोज नादीयदवाला आणि दिग्दर्शक अनीस बाझ्मीची इच्छा होती. पण, काही कारणास्तव तसे होऊ शकले नाही. संजय दत्तच्या निर्मिती संस्थेअंतर्गत चित्रीत होत असलेल्या हसमुख पिघल गया चित्रपटात अमिताभ पाहुण्या कलाकाराची भूमिका करणार आहेत. राज कपूर यांच्या अनारी चित्रपटातील प्रसिद्ध गाणे किसिकी मुस्कराहटो पे हो निसार, किसी का दर्द मिल सके.. यावर ते सादरीकरण करताना चित्रपटात दिसतील. चित्रपटात असा क्षण येतो ज्यावेळी मुख्य अभिनेता अनारी मधील गाणे गात असतो. त्याचवेळी मी गाण्यामध्ये प्रवेश करतो, असे अमिताभ यांनी सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा