भारताला विकसनशील देश म्हटल्यावर आपल्याला राग येत असल्याचे बॉलीवूडचे दिग्गज अभिनेता अमिताभ बच्चन म्हणाले आहेत. एका कार्यक्रमात ते उपस्थित होते. त्यावेळी ते बोलत होते.
मला या गोष्टीचा गर्व वाटतो की, एकेकाळी ज्या वस्तूंसाठी आमच्यावर टीका केली जात होती, जसे की भारताची लोकसंख्या वगैरे त्यांच्याकडे आता विकसित देश हे उत्तम ग्राहक वापराच्या दृष्टीने पाहत आहेत. हे व्यवस्थित चालू आहे. भारताला विकसनशील देश म्हटले की मला राग येतो. भारताला विकसित देश म्हणून ओळखले जावे असे मला वाटते आणि त्या दिशेने आम्ही वाटचालही करत आहोत, असे अमिताभ बच्चन म्हणाले.
अमिताभ म्हणाले की, प्रेक्षकच आम्हला घडवत असतात. त्यांची पसंती बदलत असते. जेव्हा अमिताभ हे चित्रपटसृष्टीत आले त्यावेळेस लोकांनी त्यांची उंची खूप आहे आणि कोणतीच अभिनेत्री त्यांच्यासोबत काम करणार नाही, असे म्हणत नाकारले होते. त्यांचे वडिल एक प्रसिद्ध कवी आहेत हे माहित असल्यामुळे तसेच काहीतरी करण्याचा सल्ला त्यांना लोकांनी दिला होता. प्रत्येकाने लक्षात ठेवले पाहिजे की, टीका या उत्तेजित करत असतात आणि यातूनच काहीतरी चांगल करण्याची प्रेरणा आपल्याला मिळत असते. ज्या लोकांनी मला आधी नाकारले होते त्या सर्वांच्या चित्रपटात मी काम केले आहे, असे बिग बी म्हणाले.
भारताला विकसनशील देश म्हटलेले आवडत नाही- बिग बी
भारताला विकसनशील देश म्हटल्यावर आपल्याला राग येत असल्याचे बॉलीवूडचे दिग्गज अभिनेता अमिताभ बच्चन म्हणाले आहेत.
First published on: 09-12-2013 at 11:27 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amitabh bachchan i hate india being called a developing nation