बॉलिवूड महानायक अमिताभ बच्चन यांचा पुन्हा एकदा एक नवीन अवतार पाहायला मिळत आहे. अमीताभ यांनी अनेक वेळा भूमिकेनुसार आपल्या दिसण्यात नवनवे प्रयोग केले आहेत. अलिकडेच ते ‘कौन बनेगा करोडपती’साठीच्या लांब केसवाल्या ‘लालन भैया’च्या अवतारात समोर आले. या आपल्या नव्या लूकचा फोटो त्यांनी टि्वटरवर पोस्ट केला आहे. अमिताभ बच्चन यांच्या व्यक्तिमत्वाने आणि अदाकारीने अनेकांना प्रेरणा दिली आहे. अमिताभ यांनी ‘चिनी कम’ चित्रपटात ठेवलेल्या छोट्याश्या पिगीटेल हेअर स्टाइलचे अर्जुन रामपाल आणि शाहरूख खानने सुध्दा अनुकरण केले होते. चित्रपटातील आपल्या विविध प्रयोगांनी आणि अनोख्या लूकद्वारे अमिताभ यांनी चाहत्यांना अनेकवेळा आश्चर्यचकीत केले आहे. या वयात सुध्दा अमिताभ यांची प्रयोगशीलता, दांडगा उत्साह आणि काम करण्याची उर्जा पाहून अनेकजण थक्क होतात.

Story img Loader