‘दो बुंद जीवन के’ असे म्हणत राष्ट्रीय पोलिओ निर्मूलनाच्या मोहिमेची धुरा सांभाळणारा महानायक अमिताभ बच्चन याने आता राज्यात तंबाखूविरोधी अभियानासाठी पुढाकार घेतला आहे. ‘सलाम बॉम्बे फाऊंडेशन’ आणि सार्वजनिक आरोग्य विभागाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या या अभियानात विनामोबदला सहभागी होण्याची तयारी अमिताभने दाखविली असल्याची माहिती आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
राज्यात दरवर्षी सुमारे २० हजार लोकांना तोंडाचा कर्करोग होतो. तरूणवर्गही तबाखू सेवनाकडे ओढला जात असून  ही गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन त्यासाठी राबविण्यात येणाऱ्या मोहिमेत सहभागी होण्याची तयारी अमिताभने दाखविली आहे. त्यानुसार तंबाखूचे दुष्परिणाम पटवून देण्यासाठी ३० सेकंदाच्या तीन चित्रफिती तयार करण्यात येणार आहेत. त्यात अमिताभ पोलीस आधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रफित तयार करण्यासाठी सुमारे ८० लाख रुपयांचा खर्च अपेक्षित असून राज्य सरकारच्या मान्यतेनंतर चित्रिकरणाला सुरुवात होणार आहे.

Story img Loader