बच्चन कुटुंबातील छोटी आराध्या सर्वांच्या कौतुकाचा विषय असणे स्वाभाविक आहे. लावण्याची खाण असलेली तिची आई जगतसुंदरी असून, आजोबा अमिताभ बच्चन बॉलिवूडचे सुपरस्टार आहेत. बच्चन कुटुंबियात जन्माला आलेली आराध्या जन्माला येतानाच आपले भाग्य घेऊन आली आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. अनेक वेळा रविवारी अमिताभ बच्चन चाहत्यांच्या गर्दीला अभिवादन करण्यासाठी बंगल्या बाहेर येतात. यावेळी चाहत्यांना अभिवादन करण्यासाठी महानायक एकटे न येता त्यांच्याबरोबर छोटी आराध्यादेखील होती. अमिताभ बच्चन छोट्या आराध्याला कडेवर घेऊन चाहत्यांना भेटायला बंगल्या बाहेर आले होते. इतकी मोठी गर्दीपाहून आराध्याच्या चेहऱ्यावर काहीसे आश्चर्यकारक भाव उमटले. आराध्याला पाहताच चाहात्यांमध्येदेखील उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. बिग बींनी आराध्यासोबतचा आपला हा फोटे फेसबुकवरदेखील शेअर केला आहे.

Story img Loader